रूपा गांगुलींची चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 01:46 AM2017-07-30T01:46:55+5:302017-07-30T01:46:58+5:30
भाजपाच्या राज्यसभा सदस्य रूपा गांगुली यांची बालतस्करी प्रकरणात शनिवारी सीआयडीच्या अधिका-यांनी चौकशी केली. सीआयडीच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले
कोलकाता : भाजपाच्या राज्यसभा सदस्य रूपा गांगुली यांची बालतस्करी प्रकरणात शनिवारी सीआयडीच्या अधिकाºयांनी चौकशी केली. सीआयडीच्या एका वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले की, भाजपा महिला आघाडीच्या माजी महासचिव जुही चौधरी यांच्याशी झालेल्या कथित चर्चेच्या प्रकरणात अधिकाºयांनी आज रूपा गांगुली यांची दक्षिण कोलकाता येथील घरी चौकशी केली. या प्रकरणात जुही या आरोपी असून त्या तुरुंगात आहेत.
सीआयडीने या वर्षी या प्रकरणाचा पर्दाफाश केला होता. मुलांना दत्तक देण्याच्या नावाखाली अवैध मार्गाने त्यांची विक्री केली जात असल्याचा आरोप आहे. काही विदेशी नागरिकांनाही मुले विक्री केली जात होती.
याबाबत पत्रकारांशी बोलताना खा. रूपा गांगुली म्हणाल्या की, या प्रकरणात अधिकारी मला काही प्रश्न विचारू इच्छित होते. मला जी माहिती आहे, ती मी त्यांना दिली. माझ्याविरुद्ध कोणतेही आरोप नाहीत. हा राजकीय सुडाचा प्रकार आहे. मी पहिल्या दिवसापासून सांगत आहे की, ते माझा निष्कारण वेळ वाया घालवत आहेत.
राज्यात भाजपा कार्यकर्त्यांविरुद्ध खोटे गुन्हे दाखल केले जात आहेत, असे सांगून त्या म्हणाल्या की, मला असे वाटते की, या प्रकरणात जुही चौधरी दोषी नाहीत.(वृत्तसंस्था)
अनेकांना अटक
सीआयडीने या प्रकरणात अनेकांना अटक केली आहे. जुही चौधरी आणि बालगृहाच्या वरिष्ठ अधिकारी सोनाली मंडल, बालगृहाच्या अध्यक्षा चंदना चक्रवर्ती, त्यांचे भाऊ मानस भौमिक यांना यापूर्वीच अटक झाली आहे. १ ते १४ वर्षांच्या १७ मुलांना विदेशात विक्री केल्याचा आरोप या लोकांवर आहे.