मृत्युंजय फ्रेंड्स सर्कल तर्फे कळवणला रावण दहन

By admin | Published: October 11, 2016 12:02 AM2016-10-11T00:02:23+5:302016-10-11T01:15:55+5:30

Ravana combustion by the deceased's Circle Circulation | मृत्युंजय फ्रेंड्स सर्कल तर्फे कळवणला रावण दहन

मृत्युंजय फ्रेंड्स सर्कल तर्फे कळवणला रावण दहन

Next


कळवण -
विजयादशमीच्या शुभमुहूर्तावर मृत्युंजय फ्रेंड्स सर्कल कळवण या मंडळाने आयोजित रावण दहन २०१६या कार्यक्र मात रावण दहन करु न नवरात्र उत्सवाची सांगता माऊली मैदानावर करण्यात येणार आहे.
पारंपारिक वाजाच्या लोकगीतापासून रिमिक्स गाण्यापर्यंत विविधता ,वाजणार्या टाळ्या आणि टिपर्या अशा विविध रंगाने नवरात्र उत्सव कळवण तालुक्यातील आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरलेला आहे , नवरात्र उत्सवाची सांगता कळवण शहरात मृत्युंजय फ्रेंड्स सर्कल कळवण आयोजित रावण दहन करून केली जाते. त्याची जय्यत तयारी कळवण शहरातील माऊली मैदानावर पूर्ण झाली असून या कार्यक्र मासाठी जिल्ह्यातील विविध मान्यवरांना आमंत्रित केले असून एकूणच शहरात नवरात्र उत्सवात विविध कार्यक्र मांचे आयोजन करून कळवणकरांनी धार्मिक परंपरा कायम टिकून ठेवली आहे
कळवण शहरात नवदुर्गा फ्रेंडस सर्कल ,विठ्ठल मंदिर लेन ,दुर्गामाता नवरात्र मित्र मंडळ ,सप्तशृंगी देवी नवरात्र मित्र मंडळ ,शिवाजीनगर नवरात्र उत्सव मंडळ ,दुर्गा मित्र मंडळ मत फुलाबाई चौक नवरात्र उत्सव मंडळ ,माता मित्र मंडळ आदि मंडळाच्या माध्यमातून नवरात्र कळवण शहरात उत्सवात साजरा केला जात आहे ,नवरात्र उत्सवातील भारिनयमन यंदाच्या वर्षी न झाल्याने उत्साह द्विगुणीत झाला आहे ,गांधी चौकातील कुलस्वामिनी अंबिका देवी मंदिर ,गणेशनगर मधील श्री दुर्गा देवी मंदिरात नवरात्र उत्सव धार्मिक व मंगलमय वातावरणात विविध कार्यक्र मांचे आयोजन करून साजरा केला जात आहे

यंदाच्या वर्षी श्रीरामाची कळवण शहरातून मिरवणूक काढण्यात येणार आहे तसेच विविध कार्यक्र मांचे आयोजन करण्यात आले असल्याची माहिती मृत्युंजय कला व क्र ीडा मित्र मंडळाचे अध्यक्ष गिरीश मालपूरे शिंदे ,उपाध्यक्ष संजय येवला यांनी दिली
मागील वर्षीप्रमाणे यंदा ३१ुटी रावणाची भव्यदिव्य प्रतिकृती तयार केली असून खास रावणदहनासाठी उपयुक्त हजारो रु पयांचे फटाके पारोळा व वैजापूर येथे मागणी करून मागविण्यात आले आहेत ,तर नासिकरोड येथील जेलरोडचे रामनगरी ढोलपथक विजयादशमीदिनी श्रीराम मिरवणुकीचे खास आकर्षण राहणार असून आदीवासी नंदीबैल नृत्य कळवणकरांचे लक्ष वेधून घेणार आहे.(वार्ताहर)

Web Title: Ravana combustion by the deceased's Circle Circulation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.