नवी दिल्लीच्या सुभाष पार्कात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं रावणाचं दहन

By ऑनलाइन लोकमत | Published: September 30, 2017 05:53 PM2017-09-30T17:53:00+5:302017-09-30T22:52:03+5:30

संपूर्ण देशात विजया दशमीचा सण उत्साहात साजरा करण्यात येत आहे. देशात दस-याच्या दिवशी रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्याची परंपरा आहे.

Ravana dahan programme dussehra | नवी दिल्लीच्या सुभाष पार्कात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं रावणाचं दहन

नवी दिल्लीच्या सुभाष पार्कात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं रावणाचं दहन

Next

नवी दिल्ली - संपूर्ण देशात विजया दशमीचा सण उत्साहात साजरा करण्यात येत आहे. देशात दस-याच्या दिवशी रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचं दहन करण्याची परंपरा आहे. दसरा सणाच्या पार्श्वभूमीवर गल्लीपासून ते मोठ-मोठ्या मैदानात रावणाचे दहन केले जाते.  
राजधानी नवी दिल्लीतील सुभाष पार्कातही नवश्री धार्मिक रामलीला कमिटीतर्फे रावण दहनाच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रावणाच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे दहन केले.

- या कार्यक्रमासाठी राष्ट्रपती रामनाथ कोविंद, उप-राष्ट्रपती व्यंकय्या नायडू याच्याव्यतिरिक्त केंद्रीय मंत्री डॉ. हर्षवर्धन, विजय गोयल, दिल्लीचे भाजप अध्यक्ष मनोज तिवारीदेखील उपस्थित. 

- रामलीला मैदानावर पोहोचलेले राष्ट्रपती, उपराष्ट्रपती, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अन्य पाहुण्यांनी परंपरेनुसार पूजा केली. 
 
- माजी पंतप्रधान मनमोहन सिंगदेखील कार्यक्रमासाठी उपस्थिती. 






  




Web Title: Ravana dahan programme dussehra

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.