रवीना छोट्या पडद्यावर सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री

By admin | Published: February 23, 2016 06:41 PM2016-02-23T18:41:07+5:302016-02-23T20:39:58+5:30

मोठ्या पडद्यावरून रवीना टंडनने काही काळ ब्रेक घेतला होता. त्यानंतर तिचे दर्शन छोट्या पडद्यावर झाले आहे. अभिनेत्री रविना टंडन छोट्या पडद्यावर सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री झाला आहे.

Raveena is the highest grossing actress on a small screen | रवीना छोट्या पडद्यावर सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री

रवीना छोट्या पडद्यावर सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री

Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. २३ - मोठ्या पडद्यावरून रवीना टंडनने काही काळ ब्रेक घेतला होता. त्यानंतर तिचे दर्शन छोट्या पडद्यावर झाले आहे. अभिनेत्री रविना टंडन छोट्या पडद्यावर सर्वाधिक कमाई करणारी अभिनेत्री झाला आहे. तीला एका भागासाठी १.२५ कोटी रुपयांची ऑफर आली आहे.  ‘शाईन ऑफ इंडिया’ हा डान्स रिअॅलिटी शो ‘व्ही’ चॅनलवर दिसणार असून अभिनेत्री फरनाज शेट्टी शोची होस्ट आहे.
 
अभिनेत्री रविना टंडन लवकरच शाईन ऑफ इंडिया या डान्स रिअ‍ॅलिटी शोमध्ये जज म्हणून दिसणार आहे. या शोच्या एका भागासाठी तीला १.२५ कोटी रुपये मानधन दिले जाणार आहे.
 
शाईन ऑफ इंडिया मध्ये ती अभिनेता गोविंदा आणि कोरिओग्राफर सरोज खान यांच्यासोबत परीक्षकांच्या खुर्चीत दिसेल. रविनाने याआधी  साहिब, बिवी और गुलाम, छोटे मियाँ आणि कॉमेडी का महामुकाबला या टीव्ही शोमध्ये दिसली आहे.
 
यापूर्वी,  शिल्पा शेट्टी आणि माधुरी दीक्षित यादेखील रिअॅलिटी शोमध्ये जज म्हणून दिसल्या होत्या. त्यांनाही प्रत्येक एपिसोडला एक कोटींचं मानधन देण्यात आलं होतं.
 

Web Title: Raveena is the highest grossing actress on a small screen

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.