Ravi Kishan: "आई बरी होऊन घरी आली", अभिनेता रवि किशन यांच्या मातोश्रींची कॅन्सरवर मात
By ऑनलाइन लोकमत | Published: May 19, 2022 12:55 PM2022-05-19T12:55:45+5:302022-05-19T12:57:38+5:30
आपल्या राजकीय स्टेटमेंटमुळे तर कधी अभियनाच्या फिल्मी दुनियेमुळे ते कायम चर्चेत असतात.
मुंबई - भाजप खासदार आणि आपल्या दमदार अभिनयाने सिनेक्षेत्रात वेगळ स्थान निर्माण केलेल्या भोजपुरी अभिनेता रवि किशन यांनी भावनिक पोस्ट शेअर केली आहे. रविकिशन यांच्या आईला कॅन्सर झाला असून यापूर्वी त्यांनी याबाबत माहिती दिली होती. मुंबईतील टाटा कॅन्सर हॉस्पीटलमध्ये त्यांच्या आईवर यशस्वी शस्त्रक्रिया झाली असून रवि किशन यांनी आईचे घरी आगमन होताच, आईसोबतचा फोटो शेअर केला आहे. त्यामध्ये, आईने त्यांच्या डोक्यावर हात ठेवल्याचं दिसून येत आहे.
आपल्या राजकीय स्टेटमेंटमुळे तर कधी अभियनाच्या फिल्मी दुनियेमुळे ते कायम चर्चेत असतात. मध्यंतरी सोशल मीडियावरही ते जास्त सक्रीय पाहायला मिळाले. मात्र, गेल्या काही दिवसांपासून रवि किशन हे अनेक समस्यांचा सामना करत आहेत. काहि महिन्यांपूर्वी आपल्या भावाला गमावल्यानंतर आता त्यांना आईच्या प्रकृतीची चिंता आहे. आईला कॅन्सर झाल्याचे समजताच त्यांना मोठा धक्का बसला. मात्र, या धक्क्यातून सावरत त्यांनी आईच्या उपचारासाठी मेहनत घेतली. त्यामुळेच, त्यांच्या आईने कॅन्सवर मात केली. रविकिशन यांनी फेसबुक पोस्ट करत आईने कॅन्सर रोगावर मात करुन लढाई जिंकल्याचं म्हटले आहे. आई बरी होऊन आज घरी आलीय, असे कॅप्शन त्यांनी फेसबुक पोस्टला दिले आहे.
टाटा कैन्सर हॉस्पिटल के वरिष्ठ डॉक्टर श्री पंकज चतुर्वेदी जी और उनकी समस्त डॉक्टर टीम को दिल से धन्यवाद माँ घर लौटी आप सब ने जान लगा दी उनको ठीक करने में 🙏 pic.twitter.com/2jpUjoTM5l
— Ravi Kishan (@ravikishann) May 18, 2022
आपल्या सर्वांची प्रार्थना, कॅन्सर हॉस्पीटलचे वरिष्ठ डॉक्टर पंकज चतुर्वैदी यांच्या यशस्वी शस्त्रक्रियेमुळे माझ्या आईला नवीन जीवन मिळाले आहे. सर्वांचे मनापासून आभार मानतो, असेही रवि किशन यांनी म्हटले आहे. दरम्यान, यापू्र्वी 25 एप्रिल 2022 रोजी रविकिशन यांनी ट्विटरवर पोस्ट करुन आईंना कॅन्सर झाल्याची माहिती फॅन्सला दिली होती. तसेच, मुंबईच्या टाटा कॅन्सर हॉस्पीटलमध्ये उपचार होत आहेत, असेही त्यांनी सांगितले होते.