सरकारनं अर्थव्यवस्था बॉक्स ऑफिसवर आणून ठेवलीय; सोशल मीडियावर केंद्रीय मंत्री ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Published: October 12, 2019 10:43 PM2019-10-12T22:43:14+5:302019-10-12T22:48:26+5:30

चित्रपटगृहाबाहेर ब्लॅक करणंदेखील रोजगार आहे असंही म्हणाल का; नेटकऱ्यांचा सवाल

ravi shankar prasad trolled on social media after his statement about economy and box office collection | सरकारनं अर्थव्यवस्था बॉक्स ऑफिसवर आणून ठेवलीय; सोशल मीडियावर केंद्रीय मंत्री ट्रोल

सरकारनं अर्थव्यवस्था बॉक्स ऑफिसवर आणून ठेवलीय; सोशल मीडियावर केंद्रीय मंत्री ट्रोल

Next

मुंबई: देशात मंदी असल्याचा विरोधकांचा दावा फेटाळून लावणारे केंद्रीय मंत्री रवीशंकर प्रसाद सोशल मीडियावर ट्रोल झाले आहेत. प्रसाद यांनी आर्थिक मंदीचा दावा फेटाळताना प्रदर्शित झालेल्या चित्रपटांच्या कमाईच्या आकड्यांचा आधार घेतला होता. त्यावरुन सोशल मीडियानं प्रसाद यांची जोरदार खिल्ली उडवली आहे. 

दोन ऑक्टोबरला प्रदर्शित झालेल्या तीन चित्रपटांनी १२० कोटींची कमाई केली आहे. अर्थव्यवस्थेची स्थिती उत्तम असल्यानंच चित्रपटांनी कोट्यवधींची कमाई केली असल्याचं प्रसाद म्हणाले होते. त्यांच्या या दाव्याचे पडसाद ट्विटरवर लगेचच पाहालया मिळाले. या सरकारनं अर्थव्यवस्था बॉक्स ऑफिसवर आणून ठेवलीय, असं ट्विट एका वापरकर्त्यानं केलं आहे. तर दुसऱ्या एका व्यक्तीनं उद्या हे सरकार चित्रपटगृहाबाहेर तिकिटांचा काळा बाजार करण्यालाही रोजगार म्हणेल, असा टोला लगावला आहे.







चित्रपट उत्तम कमाई करत असल्यानं अर्थव्यवस्था उत्तम स्थितीत असल्याचा दावा करणाऱ्या प्रसाद यांची सोशल मीडियावर नेटकऱ्यांनी धुलाई केली आहे. प्रसाद यांचाच तर्क वापरायचा झाला तर मग २००८ मध्ये केआरकेच्या देशद्रोही चित्रपटानं १० लाखदेखील कमावले नव्हते. मग ते वर्ष भारतीय अर्थव्यवस्थेसाठी वाईट होतं असं म्हणायचं का, असा प्रश्न एकानं विचारला आहे.



 



काय म्हणाले होते रवीशंकर प्रसाद?
'मला चित्रपट अतिशय आवडतात. सध्या चित्रपट चांगला व्यवसाय करत आहेत. २ ऑक्टोबरला ३ चित्रपट प्रदर्शित झाले. सिने उद्योगाच्या एका जाणकारानं दिलेल्या आकडेवारीनुसार या चित्रपटांनी त्या दिवशी १२० कोटी रुपयांची कमाई केली. देशातील आर्थिक परिस्थिती उत्तम असल्यानंच चित्रपट इतकी कमाई करत आहेत,' असं प्रसाद यांनी म्हटलं होतं.

 

Web Title: ravi shankar prasad trolled on social media after his statement about economy and box office collection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.