रवींद्र गायकवाडांवरील विमानबंदी अखेर उठली

By admin | Published: April 8, 2017 05:42 AM2017-04-08T05:42:14+5:302017-04-08T05:42:14+5:30

शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विमान प्रवासावरील बंदी एअर इंडियाने तत्काळ प्रभावाने हटवली

Ravindra Gaikwad's airbase stood still at the end | रवींद्र गायकवाडांवरील विमानबंदी अखेर उठली

रवींद्र गायकवाडांवरील विमानबंदी अखेर उठली

Next

सुरेश भटेवरा,
नवी दिल्ली- हवाई वाहतूक मंत्रालयाच्या लेखी आदेशानुसार शिवसेनेचे खासदार रवींद्र गायकवाड यांच्या विमान प्रवासावरील बंदी एअर इंडियाने तत्काळ प्रभावाने हटवली असून, अन्य एअरलाइन्सही आता बंदी लगेच मागे घेतील. खा. गायकवाडांनी विमान वाहतूकमंत्री अशोक गजपती राजू यांना एक पत्र पाठवून झाल्या प्रकाराबद्दल खेद व्यक्त केला.
एअर इंडियाच्या संबंधित कर्मचाऱ्याची आपण माफी मागणार नाही, अशा ठाम भूमिकेवर अडून बसलेल्या गायकवाडांनी हवाई वाहतूकमंत्र्यांना उद्देशून लिहिलेल्या पत्रात म्हटले की, या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. त्यात काय घडले, ते बाहेर येईलच व त्यातून दोषीवर जबाबदारीही निश्चित केली जाईल. तथापि, अशा घटनेची भविष्यात संभाव्य पुनरावृत्ती होईल, या नजरेने सदर प्रकरणाकडे पाहिले जाऊ नये. विमानबंदीमुळे मला संसद सदस्य या नात्याने माझी कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या पार पाडणे अवघड झाले आहे. सबब ही बंदी उठवण्याची मी विनंती करतो.
> नवा गोंधळ
हा वाद संपतो, तोच पश्चिम बंगालमधील तृणमूल काँग्रेसच्या खासदार श्रीमती डोला सेन यांच्या विमानप्रवासामुळे नवा वादंग निर्माण झाला आहे. त्यांच्यामुळे एअर इंडियाच्या विमानाच्या उड्डाणाला विलंब झाला. त्यांच्या मातोश्री सध्या व्हीलचेअरवर आहेत.
त्यामुळे त्यांनी अधिक रक्कम भरून जिथे पाय लांब करण्यास अधिक जागा आहे, अशा सीटची व्यवस्था करण्यास खा. सेन यांनी सांगितले होते. त्यांना आपत्कालीन दरवाजापाशीची जागा देण्यात आली.
पण त्यांनी सोबतची व्यक्ती व्हीलचेअरवर असल्याचे सांगितले नव्हते. त्यामुळे विमानात त्या आल्यानंतर गोंधळ झाला, असे एअर इंडियाच्या अधिकाऱ्याने सांगितले.

Web Title: Ravindra Gaikwad's airbase stood still at the end

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.