Video: रवींद्र जडेजाच्या आमदार पत्नीला राग अनावर; महिला महापौर आणि खासदारावर भडकल्या
By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2023 16:06 IST2023-08-17T16:01:52+5:302023-08-17T16:06:38+5:30
आमदार रिवाबा जडेजाचा आपल्याच पक्षातील महापौर आणि खासदारासोबत वाद, नेमकं कारण काय? पाहा व्हिडिओ...

Video: रवींद्र जडेजाच्या आमदार पत्नीला राग अनावर; महिला महापौर आणि खासदारावर भडकल्या
जामनगर: गुजरातच्या जामनगरमधून एक मोठी घटना समोर आली आहे. भाजपच्या तीन बड्या महिला नेत्या एकमेकांना भिडल्या. क्रिकेटर रवींद्र जडेजाची पत्नी आणि जामनगर उत्तरच्या आमदार रिवाबा जडेजा यांनी आधी महापौर बिना कोठारी यांच्याशी वाद घातला, यानंतर स्थानिक खासदार पूनम माडम यांनी मध्यस्थी करण्याचा प्रयत्न केल्यावर रिवाबा त्यांच्यावरही भडकल्या. या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
पाहा Video:-
BJP MP पूनम माडम, BJP विधायक Rivaba Jadeja और मेयर बीना कोठारी के बीच खुलेआम हुई बहस का ये वीडियो Viral हो रहा है…. कोई गुजराती साथी बता सकता है कि क्या बात हो रही है ?? 🤔 pic.twitter.com/sJU3NVu1pr
— Rahul Tahiliani (@Rahultahiliani9) August 17, 2023
आमदार रिवाबा जडेजा आणि जामनगरच्या महापौर बिना कोठारी यांच्यात काही गोष्टीवरून वाद झाला. बीना रिवाबाला म्हणाल्या की, तुम्ही तुमच्या मर्यादेत राहा, जास्त हुशारी दाखवू नका. यामुळे रिवाबाला राग आला आणि त्यांनीही महापौरांना सुनानवले. हा वाद पाहून खासदार पूनम माडम बचावासाठी आल्या असता रिवाबाने त्यांच्यासोबतही वाद घालायला सुरुवात केली. रिवाबा खासदार पूनम यांना म्हणाल्या की, हा वाद तुमच्यामुळेच सुरू झाला आहे. तुम्ही सर्वांसमोर मला स्मार्ट, ओव्हरस्मार्ट म्हणालात.
वाद कशामुळे सुरू झाला?
या वादानंतर रिवाबाने सांगितले की, स्वातंत्र्य सैनिकांना श्रद्धांजली देण्यासाठी महापालिकेने एक कार्यक्रम आयोजित केला होता. कार्यक्रम 9 वाजता सुरू होणार होता, पण पूनम माडम 10.30 वाजत्या आल्या. स्वातंत्र्यसैनिकांना श्रद्धांजली वाहताना मी चप्पल काढली. मी चप्पल काढत होते, तेव्हा खासदारांनी माझ्यावर टिप्पणी केली. देशाचे पंतप्रधान किंवा राष्ट्रपतीही अशा कार्यक्रमांना चप्पल काढत नाहीत, हिला माहित नसावे, असं खासदार म्हणाल्या. या गोष्टीचा रिवाबाला राग आला आणि त्यांनी महापौर आणि खासदारांना सुनावलं.