एकनाथ शिंदेंची ताकद वाढली! दादा भुसे, संजय राठोड गुवाहाटीत दाखल, गळाभेटीने स्वागत

By ऑनलाइन लोकमत | Published: June 23, 2022 10:36 PM2022-06-23T22:36:33+5:302022-06-23T22:37:43+5:30

शिवसेनेच्या बंडखोर आमदारांनी एकमताने एकनाथ शिंदे यांना गटनेता घोषित आहे.

ravindra phatak dada bhuse and sanjay rathod reached guwahati rebel eknath shinde group welcome them | एकनाथ शिंदेंची ताकद वाढली! दादा भुसे, संजय राठोड गुवाहाटीत दाखल, गळाभेटीने स्वागत

एकनाथ शिंदेंची ताकद वाढली! दादा भुसे, संजय राठोड गुवाहाटीत दाखल, गळाभेटीने स्वागत

googlenewsNext

गुवाहाटी: महाविकास आघाडीच्या ठाकरे सरकारमधील मंत्री आणि शिवसेनेतील बडे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या बंडखोरीनंतर तिसऱ्या दिवशी राजकीय हालचालींना प्रचंड वेग आल्याचे दिसत आहे. एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेल्या आमदारांना परत आणण्यासाठी शिवसेनेकडून जोरदार प्रयत्न करण्यात येत आहेत. मात्र, एकनाथ शिंदे गट आपल्या भूमिकेवर ठाम आहे. यातच आता राज्याचे कृषी मंत्री दादा भुसे आणि संजय राठोड गुवाहाटीत दाखल झाले आहेत. यानंतर आता एकनाथ शिंदे यांची ताकद वाढल्याचे बोलले जात आहे. 

एकनाथ शिंदे यांच्या बंडखोरीनंतर राज्यातील राजकारण अक्षरश: ढवळून निघाले आहे. सुरुवातीला एकनाथ शिंदे यांच्यासह ३० हून अधिक आमदार आधी सूरत आणि नंतर गुवाहाटीला गेले. मात्र, एकनाथ शिंदे यांची मनधरणीसाठी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपले विश्वासू मिलिंद नार्वेकर आणि शिंदे यांचे निकटवर्तीय रवींद्र फाटक यांना सूरतला पाठवले होते. मात्र, त्याचा काही उपयोग झाला नाही. मात्र, आता तिसऱ्या दिवशी एकनाथ शिंदे यांचे निकटवर्तीय असलेले रवींद्र फाटकही गुवाहाटीत दाखल झाले आहेत. शिवसेनेसाठी हा एक मोठा धक्का असल्याचे मानले जात आहे. 

फाटक, भुसे, राठोड यांचे गळाभेटीने स्वागत

दिवसभरात काही आमदार एकनाथ शिंदे गटाला जाऊन मिळाले. तर काही गुवाहाटीवरून परत आले. गुवाहाटीवरून परतलेल्या शिवसेना आमदारांनी केलेले आरोप गुवाहाटी येथे असलेल्या आमदारांनी व्हिडिओ जारी करत खोडून काढले आणि पक्षप्रमुखांना यांच्यापासून सावध राहावे, असा सल्लाही दिला. यानंतर आता रात्री उशिरा राज्याचे कृषीमंत्री दादा भुसे, संजय राठोड आणि रवींद्र फाटक गुवाहाटी येथे दाखल झाले. एकनाथ शिंदे यांच्यासह अन्य आमदारांनी गळाभेट घेऊन त्यांचे स्वागत केले. 

दरम्यान, बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांचा नवा व्हिडिओ माध्यमांमध्ये झळकला आहे. या व्हिडिओत बंडखोर आमदार एकमताने एकनाथ शिंदे यांना गटनेता बनवत असल्याचे घोषित करत आहेत. त्यानंतर शिंदे आमदारांना मार्गदर्शन करताना म्हणाले की, जे सुख-दुःख आहे, ते आपले सगळ्यांचे एक आहे. काही असेल तर आपण एकजुटीने पुढे जाऊ, विजय आपलाच आहे. तुम्ही जे म्हणालात ते नॅशनल पार्टी आहे, महाशक्ती आहे, अख्ख्या पाकिस्तान काय परिस्थिती होती माहितीय असे त्यांनी सांगितले. त्यानंतर नॅशनल पार्टी, महाशक्ती. त्यांनी मला सांगितलेय, तुम्ही जो हा निर्णय घेतला आहे, हा देशातला ऐतिहासिक निर्णय आहे. तुमच्यामागे आमची पूर्ण शक्ती आहे. कुठेही काही लागले तर कधीही कमी पडणार नाही, याची प्रचिती आपल्याला जेव्हा आवश्यकता भासेल तेव्हा येईल असे सांगत एकनाथ शिंदे यांनी अप्रत्यक्षपणे भाजपचा पाठिंबा असल्याचे सूतोवाच केले आहेत. 
 

Web Title: ravindra phatak dada bhuse and sanjay rathod reached guwahati rebel eknath shinde group welcome them

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.