Corona Vaccine: “भले लोकांचा तडफडून जीव जाऊ दे, पण नरेंद्र मोदींची महानता कायम राहिली पाहिजे”
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 01:36 PM2021-06-09T13:36:17+5:302021-06-09T13:38:43+5:30
Corona Vaccine: पंतप्रधानांचे भाषण हे व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीतून आल्याचा टोला लगावण्यात आला आहे.
नवी दिल्ली: कोरोनाची दुसरी लाट बऱ्याच प्रमाणात ओसरताना दिसत आहे. कोरोना लसीकरण मोहिमेवर अधिक भर दिला जात असून, आता २१ जून २०२१ पासून १८ वर्षांवरील सर्वांना मोफत लस मिळणार असल्याची घोषणा अलीकडेच पंतप्रधाननरेंद्र मोदी यांना देशाला संबोधित करताना केली. एखाद्या आजारावर किंवा रोगावर लस येण्यास अनेक वर्षांचा काळ लोटतो. मात्र, कोरोनावरील लस अवघ्या काही महिन्यांमध्ये तयार झाली, असे मोदी म्हणाले होते. यावरून आता टीका करण्यात येत असून, पंतप्रधानांचे भाषण हे व्हॉट्सअॅप युनिव्हर्सिटीतून आल्याचा टोला लगावण्यात आला आहे. (ravish kumar criticises pm narendra modi govt on corona vaccination)
ज्येष्ठ पत्रकार रवीश कुमार यांनी पुन्हा एकदा फेसबुकच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून रवीश कुमार फेसबुक पोस्टच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींवर निशाणा साधताना दिसत आहेत. ज्याच्या पूर्वजांनी पोलीओचे दोन थेंब घेण्यासाठी २५ वर्ष लावली, तेच आता ६ महिन्यांत लसीकरण होणार असल्याच्या बाता मारत आहेत. हा एक प्रकारे प्रचारतंत्रच आहे. फेसबुकवरील एक-एक हिंदुत्ववादी पेज पाहिले की, हे आयटी सेलचे काम असणार हे स्पष्ट होते, अशी टीका रवीश कुमार यांनी केली आहे.
दमदार कामगिरी; अदानी समूहातील ‘या’ कंपनीच्या शेअर्समध्ये दररोज १९ टक्क्यांची वाढ
नरेंद्र मोदींची महानता कायम राहिली पाहिजे
मार्च आणि एप्रिलच्या महिन्यात कोरोनाशी लढण्याचे आणि त्याला पराभूत करण्याचे सर्व दावे फोल ठरू लागले. लोकांचा तडफडून मृत्यू होऊ लागला. तेव्हा असे तर्क काही तर्क देण्यात आले, ज्यामुळे भले लोकांचा तडफडून जीव गेला, तरी नरेंद्र मोदी यांची महानता कायम राहिली पाहिजे, असेच दिसून आले. खोट्याचा प्रसार करण्यासाठी केंद्राने अदृश्य व्यवस्था उभी केल्याचे वाटले, असा गंभीर आरोप रवीश कुमार यांनी केला आहे.
केंद्र सरकार आणखी १० कंपन्यांची करणार विक्री; निर्गुंतवणूक समिती गठीत
मार्च-एप्रिलमध्ये हाहाःकार उडाला
मार्च आणि एप्रिल कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या वाढल्यावर समाजात हाहाःकार उडाला. तेव्हा मोदींचे समर्थकही स्तब्ध झाले. कारण त्यांच्या घरातही तीच अवस्था होती. अचानक मोदी समर्थक तर्कहीन झाले. मात्र, पुन्हा केंद्रीय व्यवस्थेने खोटेपणाचे डोस देण्यास सुरुवात केली, जेणेकरून त्यांचा विवेक जागा होऊ नये, अशी टीका रवीश कुमार यांनी केली. रवीश कुमार यांच्या या पोस्टवर संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या.