रावत यांचा शपथविधी
By admin | Published: March 19, 2017 12:22 AM2017-03-19T00:22:51+5:302017-03-19T00:22:51+5:30
भाजपाचे नेते त्रिवेंद्र सिंग रावत यांनी शनिवारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल के. के. पॉल यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. रावत हे उत्तराखंडचे
देहरादून : भाजपाचे नेते त्रिवेंद्र सिंग रावत यांनी शनिवारी उत्तराखंडचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल के. के. पॉल यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. रावत हे उत्तराखंडचे नववे मुख्यमंत्री ठरले आहेत. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे एके काळी प्रचारक असलेल्या रावत यांची कालच भाजपा विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड झ्राली होती.
रावत यांच्यासोबत ७ कॅबिनेट आणि २ राज्यमंत्री अशा ९ मंत्र्यांचाही शपथविधी झाला. सत्पाल महाराज, हरकसिंग रावत, मदन कौशिक, अरविंद पांडे, सुबोध उनियाल, यशपाल आर्य आणि प्रकाश पंत
यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली.
रेखा आर्य आणि धनसिंग रावत यांनी राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजपाध्यक्ष अमित शाह यांची समारंभाला प्रमुख उपस्थिती होती. मोदी यांनी रावत यांचे अभिनंदन केले. केंद्रीय मंत्री राजनाथसिंग, उमा भारती, हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर यांचीही समारंभाला उपस्थिती होती.
मंत्रिमंडळात पाच माजी काँग्रेसी नेते
रावत यांच्या मंत्रिमंडळातील सुबोध उनियाल, हरक सिंग रावत, यशपाल आर्य, रेखा आर्य आणि सतपाल महाराज हे पाच जण काँग्रेसचे माजी आमदार आहेत. पहिल्या चार जणांनी गेल्या वर्षी मेमध्ये हरीश रावत यांच्यासोबत वाद झाल्याने पक्ष सोडून भाजपात प्रवेश केला. सत्पाल महाराज यांनीही २0१४ साली भाजपामध्ये प्रवेश केला.