रावत यांनी ४६ दिवसांनंतर घेतली मंत्रिमंडळाची बैठक

By admin | Published: May 13, 2016 04:20 AM2016-05-13T04:20:41+5:302016-05-13T04:20:41+5:30

उत्तराखंड विधानसभेतील शक्तिपरीक्षेत बाजी मारणारे मुख्यमंत्री हरीश रावत यांना अनिश्चिततेच्या सावटानंतर पुन्हा पद बहाल होताच ४६ दिवसांनंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचा मान मिळाला.

Rawat took 46 days to hold a cabinet meeting | रावत यांनी ४६ दिवसांनंतर घेतली मंत्रिमंडळाची बैठक

रावत यांनी ४६ दिवसांनंतर घेतली मंत्रिमंडळाची बैठक

Next

डेहराडून : उत्तराखंड विधानसभेतील शक्तिपरीक्षेत बाजी मारणारे मुख्यमंत्री हरीश रावत यांना अनिश्चिततेच्या सावटानंतर पुन्हा पद बहाल होताच ४६ दिवसांनंतर राज्य मंत्रिमंडळाची बैठक घेण्याचा मान मिळाला.
बुधवारी रात्री राष्ट्रपती राजवट मागे घेण्यात आल्याचे जाहीर होताच रावत पुन्हा मुख्यमंत्रिपदी आरूढ झाले. मंत्रिमंडळाच्या जुन्या निर्णयांच्या अंमलबजावणीला गती देण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले; तथापि नियमित होणारी पत्रकार परिषद रद्द करण्यात आली. राजकीय अस्थैर्यामुळे राज्याचे मोठे नुकसान झाल्याबद्दल रावत यांनी खंत व्यक्त केली आहे. न्यायालयाने उत्तराखंडमधील जनतेचा लोकशाहीवरील विश्वास बळकट केला आहे. राज्याला प्रगतीकडे नेताना हा वाईट काळ विसरून जाऊ या, असेही ते म्हणाले. (वृत्तसंस्था)

Web Title: Rawat took 46 days to hold a cabinet meeting

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.