संविधान हीच लोकशाहीचा ताकद रजिया पटेल: दलित अस्मिता पुरस्काराचे वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 13, 2016 12:05 AM2016-03-13T00:05:26+5:302016-03-13T00:05:26+5:30

सेंट्रल डेस्कसाठी

Razia Patel: The Distribution of Dalit Asmita Award | संविधान हीच लोकशाहीचा ताकद रजिया पटेल: दलित अस्मिता पुरस्काराचे वितरण

संविधान हीच लोकशाहीचा ताकद रजिया पटेल: दलित अस्मिता पुरस्काराचे वितरण

Next
ंट्रल डेस्कसाठी

सोबत फोटो-१३ सीटीआर ७९

जळगाव : धर्मनिरपेक्षकता टीकविणेे आणि संविधान वाचविणे हे आजच्या पिढीपुढील आव्हान असून संविधान हीच खरी लोकशाहीची ताकद असल्याचे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्त्या रजिया पटेल यांनी शनिवारी येथे आयोजित कार्यक्रमात केले. त्यांच्या हस्ते आप्पासाहेब विश्वासराव भालेराव प्रतिष्ठानतर्फे दिला जाणारा पुरस्कार उत्तमराव पाटील, ॲड. पल्लवी रेणके, सारंग पवार यांना मोठ्या उत्साहात प्रदान करण्यात आला.
भालेराव प्रतिष्ठानतर्फे दरवर्षी दलित अस्मिता पुरस्कार देऊन समाजातील विविध क्षेत्रात काम करणार्‍यांना गौरविण्यात येत असते. ला.ना. विद्यालयाच्या गंधे सभागृहात झालेल्या या कार्यक्रमास अध्यक्षस्थानी चंद्रशेखर शिखरे हे होते. तर प्रा. पी.आर. चौधरी, प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र भालेराव यांची उपस्थिती होती.
-----
इन्फो
पुरस्कार
दलित अस्मिता पुरस्कारात राजर्षि शाहू महाराज पुरस्कार उत्तमराव माधवराव पाटील (तरवडी जि. अहमदनगर), क्रांतीबा ज्योतीराव फुले पुरस्कार ॲड. पल्लवी रेणके (सोलापूर), भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुरस्कार सारंग पवार (भुसावळ) यांना सामाजिक कार्यकर्त्या रजिया पटेल यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.
-------
आठवणीला दिला उजाळा
मुस्लिम स्त्रीयांना चित्रपटगृहात बरोबर नेऊन केलेल्या आंदोलनाची आठवण यावेळी रजिया पटेल यांनी सांगून आठवणींचा उजाळा दिला. त्या म्हणाल्या फुले, आंबेडकर, शाहू महाराजांचे विचार व्यक्त करत असताना अस्मितेेचे प्रकटीकरण या पुरसस्कारातून होत आहे.

इन्फो-
श्रीमंतांची यादी जाहीर होते पण...
आजच्या काळात धर्मनिरपेक्षता आणि संविधान वाचविणे हे आव्हान असून संविधान हीच खरी लोकशाहीची ताकद आहे. धर्मापेक्षाही लोकशाही ही महत्वाची आहे. मात्र धर्माधतेमुळे लोकशाहीलाच धोका निर्माण होत आहे. आज जगातील श्रीमंतांची यादी जाहीर होते पण गरीबांची होत नाही. श्रीमंतीची बेटे येथे उभारली जात आहेत. त्यामुळे ही दरी तसेच धर्माचा राजकीय वापर हा बंद झाला पाहीजे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.
----

Web Title: Razia Patel: The Distribution of Dalit Asmita Award

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.