आरबीआयने पाच विदेशी बँकांना ठोठावला दंड
By admin | Published: December 21, 2016 11:05 PM2016-12-21T23:05:42+5:302016-12-21T23:05:42+5:30
नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 5 आंतरराष्ट्रीय बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. या बँकांमध्ये बँक ऑफ अमेरिका, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, आरबीएस, बँक ऑफ टोकियो
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 21 - नियमांचं उल्लंघन केल्याप्रकरणी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं 5 आंतरराष्ट्रीय बँकांवर दंडात्मक कारवाई केली आहे. या बँकांमध्ये बँक ऑफ अमेरिका, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, आरबीएस, बँक ऑफ टोकियो मित्सुबिशी आणि डच बँकेचा समावेश आहे. या सर्व बँकांवर फेमा कायद्याचं उल्लंघन केल्याचा रिझर्व्ह बँक ऑफ इंडियानं ठपका ठेवला आहे.
या प्रकरणात बँक ऑफ अमेरिका, स्टँडर्ड चार्टर्ड बँक, आरबीएस आणि बँक ऑफ टोकियो मित्सुबिशीकडून 10 हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे. तर जर्मनीच्या डच बँकेवर 20 हजारांचा दंड लावला आहे. आरबीआयनं 1999 फेमा कायद्यातील सेक्शन 11(3)अंतर्गत ही कारवाई करताना खाते, सूचना, निर्देश, मार्गदर्शक तत्त्वांचे उल्लंघन केल्याचा आरोप केला आहे.
आरबीआयनं या बँकांना नोटीस बजावून उत्तर मागवलं आहे. बँकांनीही लेखी स्वरूपात उत्तर दिलं असून, स्वतःची बाजू आरबीआयसमोर मांडली आहे. मात्र आरबीआयनं या उत्तरांवर समाधानी नसल्यानं ही दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे. आरबीआयनं या पाच बँकांनी मार्गदर्शक तत्त्वांचं उल्लंघन केल्याचा ठेपका ठेवतच कारवाईचा बडगा उगारला आहे.