RBIचे गव्हर्नर रघुराम राजन यांना इसिसची धमकी ?
By admin | Published: April 16, 2015 10:37 AM2015-04-16T10:37:43+5:302015-04-16T10:39:08+5:30
आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांना ईमेलद्वारे जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली असून हा ईमेल इसिस या दहशतवादी संघटनेच्या आयडीवरुन पाठवण्यात आला आहे.
Next
>ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. १६ - आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांना ईमेलद्वारे जीवे ठार मारण्याची धमकी देण्यात आली असून हा ईमेल इसिस या दहशतवादी संघटनेच्या आयडीवरुन पाठवण्यात आला आहे. मुंबई पोलिसांनी या गंभीर घटनेची दखल घेत तपासाला सुरुवात केली आहे.
आरबीआयचे गव्हर्नर रघुराम राजन यांना काही दिवसांपूर्वी एक ईमेल आला आहे. हा मेल 'isis583848' या आयडीवरुन आला असून मी तुम्हाला संपवण्यासाठी एका व्यक्तीला पैसे दिले आहेत. आता तुम्ही मला त्यापेक्षा जास्त पैसे दिले तर मी तुम्हाला सोडून देईन' असा धमकीवजा इशाराच या मेलमध्ये देण्यात आला आहे. isis (इसिस) हा उल्लेख इस्लामिक स्टेट ऑफ इराक अँड सिरीया या दहशतवादी संघटनेसाठी केला जातो. त्यामुळे हा ईमेल इसिसकडून पाठवलेला अशावा असा अंदाज वर्तवला आहे. मुंबईचे पोलिस आयुक्त राकेश मारिया यांनी एका इंग्रजी वृत्तपत्राशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला आहे. रघुराम राजन यांना धमकीचा मेल आल्याची तक्रार आमच्याकडे आली आहे असे मारिया यांनी सांगितले. पोलिसांनी केलेल्या तपासात हा मेल आयडी १० वेगवेगळ्या देशांमधून चालवला जात असल्याचे समोर आले आहे.