आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास कोरोना पॉझिटिव्ह
By हेमंत बावकर | Updated: October 25, 2020 21:51 IST2020-10-25T21:50:25+5:302020-10-25T21:51:04+5:30
Shaktikant Das: दास यांनी ट्विट करत कोरोना बाधित असल्याची माहिती दिली. तसेच बरे वाटत असून माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना सूचना देण्यात आली आहे, असे ते म्हणाले.

आरबीआय गव्हर्नर शक्तिकांत दास कोरोना पॉझिटिव्ह
रिझर्व्ह बँकेचे (आरबीआय) गव्हर्नर शक्तिकांत दास यांना रविवारी कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. दास यांनीच याची माहिती दिली असून कोरोनाची लक्षणे जाणवत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.
दास यांनी ट्विट करत कोरोना बाधित असल्याची माहिती दिली. तसेच बरे वाटत असून माझ्या संपर्कात आलेल्या लोकांना सूचना देण्यात आली आहे, असे ते म्हणाले. मी आता आयसोलेशनमध्ये काम करणार आहे. यामुळे आरबीआयच्या कोणत्याही कामावर परिणाम होणार नाही. टेलिफोन आणि व्हीसीद्वारे अधिकाऱ्यांच्या संपर्कात राहिन, असे ते म्हणाले.
काही दिवसांपूर्वीच त्यांनी कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती व्यक्त केली होती. जर करोनाची दुसरी लाट आली तर अर्थव्यवस्था रुळावर आणणे कठीण होऊन जाईल असे, म्हटले होते. ज्या प्रकारे कोरोनाने अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली आहे, त्यातून ती पुन्हा सुधारत आहे. परंतू जर दुसरी लाट आली तर परिस्थिती बिघडू शकते असे ते म्हणाले होते.