आरबीआयकडून व्याजदर 'जैसे थे'
By admin | Published: February 8, 2017 02:47 PM2017-02-08T14:47:56+5:302017-02-08T15:07:23+5:30
रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने बुधवारी तिमाही पतधोरण आढावा जाहीर केला. यावेळी रेपो रेट आणि रिव्हर्स रेपो रेटमध्ये कोणताही बदल केलेला नाही.
Next
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 8 - रिझर्व्ह बँकेने व्याजदर कायम ठेवत बाजाराला धक्का दिला आहे. यावेळी आरबीआयकडून व्याजदरात कपात होईल ही अपेक्षा फोल ठरली. आरबीआयने जागतिक अनिश्चितता आणि महागाई ही कारणे देत व्याजदर कायम ठेवला. त्यामुळे गृह आणि वाहन कर्ज स्वस्त होण्याची शक्यता मावळली आहे. व्याजदर घटले असते तर, या दोन्ही क्षेत्रांना बळकटी मिळू शकली असती.
आरबीआय गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील सहा सदस्यीय समितीने रेपो रेट 6.25 टक्के आणि रिव्हर्स रेपो रेट 5.75 टक्के कायम ठेवला. 2016-17 मध्ये विकास दर 6.9 टक्के राहील असा अंदाज आरबीआयने वर्तवला असून, 2017-18 मध्ये विकास दरात प्रगती होईल असा आरबीआयचा अंदाज आहे.
नोटाबंदीमुळे काही प्रमाणात अर्थव्यवस्थेला बसलेला फटका पुढच्यावर्षी भरुन येईल असे आरबीआयचे म्हणणे आहे. रिटेल, हॉटेल, वाहतूक आणि असंघटित क्षेत्रे वेगाने घौडदौड करतील असा आरबीआयचा अंदाज आहे.
रेपो रेट म्हणजे काय?
रिझर्व्ह बँक इतर बँकांना ज्या दराने कर्ज देते त्या कर्जावर आकारले जाणारे व्याज म्हणजे रेपो रेट. तो व्याज दर कमी झाल्यास बँका ग्राहकांच्या कर्जावरील व्याजदरात कपात करतात आणि त्याचा फायदा ग्राहकांना होतो.