RBI Recruitment: फक्त एक इंटरव्ह्यू; रिझर्व्ह बँकेत नोकरीची संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: August 4, 2020 12:18 PM2020-08-04T12:18:58+5:302020-08-04T12:20:16+5:30
आरबीआयच्या या जागांसाठी 3 ऑगस्टपासून अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे.
देशाचा आर्थिक कणा असलेल्या रिझर्व्ह बँकेने (RBI Recruitment 2020) तरुणांना नोकरीची संधी दिली आहे. RBI मध्ये डेटा अॅनालिस्ट, कन्सल्टंट, अकाऊंट स्पेशालिस्टसह एकूण 39 पदांवर भरती आयोजित केली आहे. महत्वाचे म्हणजे केवळ मुलाखतीद्वारे उमेदवार निवडला जाणारा आहे.
आरबीआयच्या या जागांसाठी 3 ऑगस्टपासून अर्ज भरण्यास प्रारंभ झाला आहे. RBI Recruitment 2020 य़ा नुसार एकूण 39 जागा भरण्यात येणार आहेत. या पदांसाठी अर्ज करण्याचा अंतिम दिवस 22 ऑगस्ट संध्याकाळी 6 वाजेपर्यंत आहे.
भारतीय रिझर्व्ह बँकेने या पदांसाठी उमेदवारांचे शैक्षणिक गुणवत्तेनुसार निवड करण्याचे ठरविले आहे. या नुसार पदांची भरती केली जाणार आहे. अकाऊंट स्पेशालिस्टसाठी उमेदवाराकडे सीएची पदवी असणे गरजेचे आहे. या सर्व पदांनुसार उमेदवाराचे वय 25 ते 40 वर्षे असावे.
आरबीआयमध्ये नोकरी करण्यास इच्छुक उमेदवारांनी आरबीआयची अधिकृत वेबसाईट rbi.org.in वर जाऊन अर्ज करायचा आहे. RBI मध्ये या पदांसाठी निवड मुलाखतीद्वारे केली जाणार आहे. मुलाखतीनंतर पात्र उमेदवारांना निवडले जाणार आहे. भरतीच्या माहितीसाठी इथे क्लिक करावे.
सुशांतच्या खात्यातून 17 नाही, 50 कोटी काढले; बिहारच्या डीजीपींचा मुंबई पोलिसांवर आरोप