RBI चे पतधोरण जाहीर, व्याजदरात बदल नाही
By Admin | Published: September 30, 2014 11:12 AM2014-09-30T11:12:52+5:302014-09-30T13:56:57+5:30
भारतीय रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केले असून व्याजदरात कोणताही बदल न करता तो ८ टक्के इतका कायम ठेवला आहे
ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. ३० - भारतीय रिझर्व्ह बँकेने पतधोरण जाहीर केले असून व्याजदरात कोणताही बदल न करता तो ८ टक्के इतका कायम ठेवला असून रिव्हर्स रेपो रेट ७ टक्क्यांवर कायम ठेवण्यात आला आहे. रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर रघुराम राजन यांनी मंगळवारी पतधोरण सादर केले.
सीआरआर व एसएलआरमध्येही कोणताही बदल करण्यात आलेला नाही. गेल्या काही दिवसांत अर्थव्यवस्थेत आणि विविध ग्राहक निर्देशांकातही सुधार दिसून आला असला असला तरी प्रमुख ‘व्याजदर जैसे थे’च राहण्याचे संकेत मिळत होते.