RBI म्हणते नोटाबंदी लागू करण्याचं कारण सांगू शकत नाही
By Admin | Published: December 29, 2016 11:06 PM2016-12-29T23:06:05+5:302016-12-29T23:06:05+5:30
पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद का करण्यात आल्या याचे कारण सार्वजनिक करता येणार नाही
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - पाचशे आणि एक हजार रुपयांच्या नोटा चलनातून बाद का करण्यात आल्या याचे कारण सार्वजनिक करता येणार नाही, असे रिझर्व्ह बँकेने म्हटले आहे. माहितीच्या अधिकाराखाली मागवण्यात आलेल्या माहितीला प्रतिसाद देताना रिझर्व्ह बँकेने हे उत्तर दिले आहे.
त्याबरोबरच जुन्या नोटांच्या जागी नव्या नोटा आणण्यासाठी आणखी किती अवधी लागेल हेही सांगण्यास रिझर्व्ह बँकेने नकार दिला. बँकेने सांगितले की हा प्रश्न अशा भावी तारखेविषयी आहे ज्याचे उत्तर आरटीआय कायद्यातील कलम 2 (फ) नुसार देता येणार नाही. हल्लीच रिझर्व्ह बँकेने संचालक मंडळाच्या बैठकीची माहिती देण्यासही नकार दिला होता.