रिझर्व्ह बँकेची स्वायत्तता कायम राखणार - दास
By ऑनलाइन लोकमत | Published: December 13, 2018 05:37 AM2018-12-13T05:37:23+5:302018-12-13T05:37:53+5:30
रिझर्व्ह बँकेची विश्वासार्हता व स्वायत्तता कायम राखण्याठी पुरेपूर प्रयत्न केले जातील, असा विश्वास नवनियुक्त गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी पदभार स्वीकारताना दिला.
नवी दिल्ली : प्रत्येक संस्थेसाठी स्वायत्तता महत्त्वाची असते. रिझर्व्ह बँकेची विश्वासार्हता व स्वायत्तता कायम राखण्याठी पुरेपूर प्रयत्न केले जातील, असा विश्वास नवनियुक्त गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी बुधवारी पदभार स्वीकारताना दिला.
ऊर्जित पटेल यांनी सोमवारी तडकाफडकी या पदाचा राजीनामा दिल्यानंतर केंद्राने मंगळवारी दास यांच्या नावाची घोषणा केली. रुजू होताना त्यांनी उच्चाधिकाऱ्यांशी केलेल्या चर्चेत केंद्र सरकार व रिझर्व्ह बँक यांच्यात असलेल्या वादावर थेट भाष्य करणे टाळले. ते म्हणाले की, स्वायत्तता समोर ठेऊनच बँक अर्थव्यवस्थेसाठी आवश्यक पावले उचलेल. यात सरकारशी असलेल्या वादाचे विषय येणार नाहीत. बँकेची स्वायत्तता, व्यवसायिकता व विश्वासार्हता यांचा विचार करून निर्णय घेतले जातील.