४0% नोटा ग्रामीण भागात पोहोचवा - आरबीआय
By admin | Published: January 4, 2017 12:15 AM2017-01-04T00:15:54+5:302017-01-04T00:15:54+5:30
नोटाबंदीमुळे गरीब आणि दुर्बल शेतकऱ्यांना भेडसावत असलेली रोखीची समस्या पाहून रिझर्व्ह बँकेने व्यावसायिक बँकांना ४0 टक्के नोटा ग्रामीण भागात पोहोचविण्याचे निर्देश दिले आहेत.
मुंबई : नोटाबंदीमुळे गरीब आणि दुर्बल शेतकऱ्यांना भेडसावत असलेली रोखीची समस्या पाहून रिझर्व्ह बँकेने व्यावसायिक बँकांना ४0 टक्के नोटा ग्रामीण भागात पोहोचविण्याचे निर्देश दिले आहेत. नोटाबंदीची ५0 दिवसांची मुदत संपली असली तरी अनेक क्षेत्रांत परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे सरकारने दररोजच्या पैसे काढण्यावर घातलेली २४ हजारांची मर्यादा उठविलेली नाही.
ग्रामीण भागातील स्थिती आणखी वाईट आहे. ग्रामीण भागातील नोटांचा पुरवठा गरजेनुसार होताना दिसून येत नाही, असे रिझर्व्ह बँकेच्या निदर्शनास आले आहे. या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेने एक अधिसूचना जारी करून बँकांसाठी निर्देश दिले आहेत. रिझर्व्ह बँकेने म्हटले की, या पार्श्वभूमीवर आवश्यक पावले आधीच उचलण्यात आली आहेत. बँकांनी आपल्याला मिळालेल्या नोटा क्षेत्रीय ग्रामीण बँका, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका, वाणिज्य बँकांच्या ग्रामीण शाखा, व्हाइट लेबल एटीएम आणि टपाल कार्यालये यांना योग्य प्रमाणात वितरीत कराव्यात. हे काम प्राधान्याने व्हायला हवे. कारण ग्रामीण क्षेत्रांत रोख वितरणाचे मुख्य वाहिन्या आहेत.
८ नोव्हेंबर रोजी मोदी
यांनी पाचशे आणि हजारांच्या
नोटा चलनातून बाद केल्याची
घोषणा केली होती. नोटा बदलून घेण्यासाठी नागरिकांना ३0 डिसेंबरपर्यंतची मुदत देण्यात आली होती. (वाणिज्य प्रतिनिधी)
- ३१ डिसेंबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्राला उद्देशून भाषण केल्यानंतर रिझर्व्ह बँकेने हे निर्देश जारी केले आहेत. आपल्या भाषणात मोदी यांनी ग्रामीण भागातील रोख रकमेची समस्या तातडीने दूर करण्यास सांगितले होते.
- रिझर्व्ह बँकेने सर्व राज्यांतील प्रत्येक जिल्ह्याचा आढावा घेतला आहे. त्यांच्या गरजेची माहितीही घेतली आहे. त्यानुसार प्रत्येक जिल्ह्याला आपल्या गरजेप्रमाणे नोटा वितरीत करण्यात आल्या आहेत.