मध्यमवर्गीयांपर्यंत पोहोचा, योजनांचे फायदे सांगा..., पंतप्रधान मोदींचा मंत्र्यांना कानमंत्र
By ऑनलाइन लोकमत | Published: January 30, 2023 12:35 PM2023-01-30T12:35:53+5:302023-01-30T12:36:17+5:30
Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केंद्रीय मंत्र्यांना मध्यमवर्गीयांना ज्या योजनांचा फायदा झाला त्या योजनांचा तपशील त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे आवाहन केल्याचे सूत्रांनी सांगितले.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी केंद्रीय मंत्र्यांना मध्यमवर्गीयांना ज्या योजनांचा फायदा झाला त्या योजनांचा तपशील त्यांच्यापर्यंत पोहोचण्याचे आवाहन केल्याचे सूत्रांनी सांगितले. १ फेब्रुवारी रोजी केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यापूर्वी केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीचे अध्यक्षस्थान भूषवताना त्यांनी हा कानमंत्र दिला.
बैठकीत मोदी म्हणाले की, सरकारी योजनांचा गरीब आणि उपेक्षितांना फायदा झाला आहे, तर मध्यमवर्गीयांसाठीही अनेक उपक्रम हाती घेण्यात आले आहेत, ज्यामुळे त्यांचे जीवनमान उंचावले आहे. केंद्रीय मंत्र्यांनी त्यांना विविध मार्गांनी मदत करणाऱ्या उपक्रमांचा तपशील मध्यमवर्गांपर्यंत पोहोचवताना वस्तुस्थिती मांडावी. भारताला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे पूर्ण होत असल्याने ब्रिटिश राजवटीची आठवण करून देणाऱ्या गोष्टी आणि कायदे रद्द करावे.केंद्र सरकारच्या योजना लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी बैठकीतील सादरीकरणाच्या प्रती मंत्र्यांना देण्यात आल्या. २०२३ मध्ये झालेली केंद्रीय मंत्री परिषदेची ही पहिली बैठक होती. कॅबिनेट सचिव राजीव गाबा यांनी मोदी सरकारने गेल्या आठ वर्षांत सामाजिक आणि आर्थिक क्षेत्राशी संबंधित केलेल्या एकूण कामांवर तीन सादरीकरण सादर केली.
मंत्रिमंडळ बैठकीतील सादरीकरणातील मुद्दे
भारताच्या दूरवरच्या भागात अनेक आयआयटी, आयआयएम आणि आयआयएस उघडण्यात आले आहेत.
प्राथमिक, माध्यमिक आणि उच्च शिक्षणाच्या सर्व स्तरांवर विद्यार्थ्यांची संख्या वाढली आणि शिक्षण सोडणाऱ्यांचे प्रमाण कमी झाले.
सरकारी शाळांच्या पायाभूत सुविधांमध्ये मानवी आणि इतर संसाधनांचा कायापालट झाला आहे.
सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर
उद्योग संवर्धन विभाग आणि अंतर्गत व्यापार सचिव अनुराग जैन यांनी सरकारने सुरू केलेल्या विविध प्रकल्पांच्या स्थितीचे सादरीकरण केले. मोदी सरकारने केलेल्या चांगल्या कामाचा संदेश देण्यासाठी विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्मचा वापर कसा केला जाऊ शकतो हे माहिती आणि प्रसारण सचिव अपूर्व चंद्रा यांनी सांगितले.