देशाच्या कानाकोपऱ्यात उपाध्याय यांना पोहोचविणार

By admin | Published: August 22, 2016 04:28 AM2016-08-22T04:28:01+5:302016-08-22T04:29:25+5:30

जनसंघाचे संस्थापक दीनदयाल उपाध्याय यांचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याचा निर्धार केंद्रातील भाजप सरकारने केला आहे.

To reach Upadhyay in the far corners of the country | देशाच्या कानाकोपऱ्यात उपाध्याय यांना पोहोचविणार

देशाच्या कानाकोपऱ्यात उपाध्याय यांना पोहोचविणार

Next

नितीन अग्रवाल,

नवी दिल्ली- जनसंघाचे संस्थापक दीनदयाल उपाध्याय यांचे नाव देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचविण्याचा निर्धार केंद्रातील भाजप सरकारने केला आहे. यासाठी एक खास योजना आखण्यात आली असून, देशातील ६८३ जागांवर दीनदयाल उपाध्याय यांचे स्मारक उभारण्यात येणार आहे. सामाजिक सभागृह आणि ग्रंथालयेही उभारण्यात येणार आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २५ सप्टेंबर रोजी दीनदयाल उपाध्याय यांच्या जयंतीदिनी या कार्यक्रमाची सुरुवात होणार असल्याचे समजते. काँग्रेसकडून फक्त नेहरू आणि गांधी कुटुंबाचे कौतुक होते, असा आरोप भाजपकडून नेहमीच होतो.
मोदींच्या हस्ते प्रारंभ होणाऱ्या या योजनेसाठी केरळातील कालिकट हे ठिकाण निवडण्यात आले आहे. येथेच उपाध्याय यांना १९६७ मध्ये जनसंघाचे अध्यक्ष निवडण्यात आले. दीनदयाल उपाध्याय यांची जन्मशताब्दी मोठ्या उत्साहात साजरी करण्याची घोषणा सरकारने यापूर्वीच केली आहे, तर केंद्रीय बजेटमध्ये यासाठी १०० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. या माध्यमातून ८० टक्के स्मारक, सामाजिक सभागृह आणि ग्रंथालय उभारण्यात येतील. यासाठी राज्य सरकारांकडून प्रस्ताव मागविले आहेत.

>कालिकटमध्ये भाजपची राष्ट्रीय कार्यकारिणी?
भाजपने आपल्या आगामी कार्यकारिणी बैठकीसाठी कालिकट हे ठिकाण निवडले आहे. २३ ते २५ सप्टेंबर या काळात होणाऱ्या बैठकीस २,५०० हून अधिक कार्यकर्ते हजर राहतील, असा अंदाज आहे. यावेळी मोदींच्या भाषणाच्या थेट प्रक्षेपणासाठी देशात ४,००० विधानसभा क्षेत्रात मोठे स्क्रीन लावण्याची योजना आहे.भाजपचे आरोप : भाजपने अनेकदा काँग्रेसवर आरोप केलेले आहेत की, नेहरू आणि गांधी कुटुंबांशिवाय अन्य दुसऱ्या नेत्यांची ओळख मिटविण्याचा प्रयत्न काँग्रेसने केला. श्यामा प्रसाद मुखर्जी, दीनदयाल उपाध्याय, नेताजी सुभाषचंद्र बोस, सरदार पटेल, शिवाजी, मौलाना आझाद, भगतसिंह, जयप्रकाश नारायण, राम मनोहर लोहिया, विवेकानंद आणि महाराणा प्रताप यांचे डाक तिकीट जारी करण्याचा निर्णय घेताना केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटले होते की, फक्त एकाच कुटुंबाला हा सन्मान मिळू शकत नाही.

 

Web Title: To reach Upadhyay in the far corners of the country

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.