सीकेपीच्या नव्या संचालकांचीही खातेदारांकडे पाठ

By admin | Published: July 8, 2015 09:55 PM2015-07-08T21:55:13+5:302015-07-08T21:55:13+5:30

ठाणे : सीकेपी बँकेच्या नव्या संचालकांनीही बँकेच्या ठेवीदार, खातेदार आणि भागधारकांकडे पाठ फिरविली आहे. बँक बचाव समितीतर्फे७ जुलैला विलेपार्ले येथे सभा आयोजित करण्यात आली होती. संचालकांनी उपस्थित राहून बँकेची सद्यस्थिती मांडावी, असे आवाहन करण्यात आले होते. परंतु एकही संचालक उपस्थित राहिला नाही. विद्यमान संचालकांना ज्या बचाव समितीने भरघोस मतांनी निवडून दिले त्यांच्याच बाबत अनास्था दाखविण्यात आली.

Read the new directors of CKP to the account holders | सीकेपीच्या नव्या संचालकांचीही खातेदारांकडे पाठ

सीकेपीच्या नव्या संचालकांचीही खातेदारांकडे पाठ

Next
णे : सीकेपी बँकेच्या नव्या संचालकांनीही बँकेच्या ठेवीदार, खातेदार आणि भागधारकांकडे पाठ फिरविली आहे. बँक बचाव समितीतर्फे७ जुलैला विलेपार्ले येथे सभा आयोजित करण्यात आली होती. संचालकांनी उपस्थित राहून बँकेची सद्यस्थिती मांडावी, असे आवाहन करण्यात आले होते. परंतु एकही संचालक उपस्थित राहिला नाही. विद्यमान संचालकांना ज्या बचाव समितीने भरघोस मतांनी निवडून दिले त्यांच्याच बाबत अनास्था दाखविण्यात आली.
सभेला दोनशेच्यावर सदस्य हजर होते. तोरस्कर, व्ही. के. सबनीस, बापू वैद्य, जान्हवी कराडकर, विवेक निक्ते आदींनी मार्गदर्शन केले. उपस्थितांचे स्वागत संजय असोडेकर यांनी केले. ही सभा बेकायदा असल्याचा दावा करणारे बिनसह्यांचे पत्रक संचालक मंडळातर्फेवाटले गेल्याने गदारोळ होऊन संचालक मंडळाचा धिक्कार करण्यात आला. शेअर कॅपिटल वाढविण्याबाबत बँकेतर्फे जे आवाहन करण्यात आले होते, ते फेटाळून लावण्यात आले व आधी बँकेचे व्यवहार सुरळीत करा, मगच त्याबाबत विचार करण्यात येईल, असे सभेत स्पष्ट करण्यात आले. ज्या कर्जदाराकडे १० कोटींच्या वर कर्ज आहे व ते फेडण्यात जे टाळाटाळ करत आहेत, त्यांची व त्यांच्या जामिनदारांची फोटोसह माहिती जाहीर केली जावी, अशी मागणी करण्यात आली. जागोजागी सभा, मेळावे घेऊन कर्जवसुली करण्यासाठी बँकेला ठोस पावले उचण्यास भाग पाडावे, असे ठरविण्यात आले. (वार्ताहर)

Web Title: Read the new directors of CKP to the account holders

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.