वाचाळांनो, तोंड आवरा!

By admin | Published: October 19, 2015 03:14 AM2015-10-19T03:14:59+5:302015-10-19T03:14:59+5:30

दादरी आणि गोमांस प्रकरणी वादग्रस्त विधाने करीत संघर्ष ओढवून घेणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी आता ‘पुरे झाले, बोलणे आवरा’ या भाषेत निर्वाणीचा इशारा दिला आहे.

Read the news | वाचाळांनो, तोंड आवरा!

वाचाळांनो, तोंड आवरा!

Next

नवी दिल्ली : दादरी आणि गोमांस प्रकरणी वादग्रस्त विधाने करीत संघर्ष ओढवून घेणाऱ्या भाजपाच्या नेत्यांना पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी आता ‘पुरे झाले, बोलणे आवरा’ या भाषेत निर्वाणीचा इशारा दिला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अशा विधानांबद्दल तीव्र नाराजी व खेद व्यक्त केल्यानंतर शहा यांनी तडकाफडकी व्हीप जारी करीत त्यांना पाचारण केले आहे. दरम्यान, काँग्रेसने शहा यांनी स्वपक्षीयांना दिलेला इशारा म्हणजे केवळ राजकीय क्लृप्ती असल्याचे म्हटले.
हरियाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर, केंद्रीय मंत्री महेश शर्मा, खासदार साक्षी महाराज आणि आमदार संगीत सोम यांची कानउघाडणी करतानाच शहा यांनी अशा विधानांमुळे मोदी सरकारचा विकासाचा अजेंडा रुळावरून घसरेल, अशी भीती व्यक्त केली. दादरी येथील इकलाखची हत्या हे राज्य सरकारचे कायदा व सुव्यवस्था राखण्यातील अपयश असून, त्याच्याशी भाजपाला काहीही घेणेदेणे नव्हते, असे शहा यांनी या नेत्यांना सुनावताना म्हटले. भाजपच्या नेत्यांनी वादग्रस्त विधाने केल्यामुळे लोकांचे लक्ष समाजवादी पक्षावरून हटून भाजपकडे केंद्रित झाले. पक्षनेत्यांना समज देण्यासाठी मोदींनी काहीही केले नसल्याची टीका सुरू असतानाच मोदींनी आपला संताप कळविला. त्यानंतर शहा कामाला लागले.(लोकमत न्यूज नेटवर्क)

>‘गोहत्या करणे हे पाप आहे आणि असे पाप करणाऱ्यांची हत्याच केली पाहिजे,’ असे वेदांमध्ये सांगण्यात आले असल्याचे नमूद करून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने ‘पांचजन्य’ या मुखपत्रा-मधून दादरी येथे गोमांस खाल्ल्याच्या अफवेवरून झालेल्या मोहम्मद इकलाख या मुस्लीम व्यक्तीच्या हत्येचे उघडउघड समर्थन केलेले आहे.
>इकलाखची हत्या ‘विनाकारण’ करण्यात आलेली नाही आणि वेदांनीही गोहत्या करणाऱ्यांना ठार मारणे अनिवार्य करण्यात आले आहे, असेही या मुखपत्रात म्हटले आहे.
>>>>>>>मुक्ताफळे
मुस्लीम भारतात राहू शकतात; मात्र त्यांना बीफ खाणे सोडून द्यावे लागेल.
- मनोहरलाल खट्टर, मुख्यमंत्री, हरियाणा दादरी गावी
एका मुुस्लिमाला जमावाने जिवंत जाळणे हा केवळ अपघात होता.
- महेश शर्मा, केंद्रीय मंत्री
पोलीस निरपराध लोकांवर
गुन्हे दाखल करीत असून, मुझफ्फरनगर दंगलीचा सूड उगविला जाईल.
- संगीत सोम, भाजपाचे आमदार

Web Title: Read the news

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.