‘लोकमत’ वर्गणीदार नोंदणीसाठी वाचकांची झुंबड
By Admin | Published: November 23, 2015 12:55 AM2015-11-23T00:55:21+5:302015-11-23T00:56:13+5:30
भेटवस्तू घेण्यासाठीही गर्दी : १३ केंद्रांवर नोंदणीसाठी व्यवस्था
कोल्हापूर : ‘लोकमत’ने कोल्हापूर शहरातील वाचकांसाठी राबविलेल्या ‘आता बस्स्...’ उपक्रमांतर्गत ‘लोकमत वाचक वर्गणीदार’ योजनेतील दुसऱ्या भेटवस्तू वाटपाच्या दुसऱ्या दिवशी अर्थात रविवारी शहराच्या विविध भागांतील १३ केंद्रांवर दिवसभर गर्दी होती. त्याचसोबत नवीन दोन वर्षांसाठीची नोंदणीही वाचकांनी रांगा लावून केली.
‘महाराष्ट्राचा मानबिंदू’ असलेल्या ‘लोकमत’ने समाजाच्या सर्वच स्तरांत वेगळे स्थान पटकाविले आहे. कोल्हापुरातही गेल्या दहा वर्षांहून अधिक काळापासून ‘लोकमत’ प्रत्येक घटना, घडामोडींचा साक्षीदार होऊन जिल्ह्याच्या विकासाच्या प्रश्नांत नेहमी अग्रेसर भूमिका बजावत आहे. वाचकांच्या विश्वासाच्या बळावर कोल्हापूरमध्येही ‘लोकमत’ने मानाचे स्थान मिळविले आहे. थेट पाईपलाईनसह हद्दवाढ, उद्योग-व्यापार क्षेत्रांचे प्रश्न, अंबाबाई मंदिराचा विकास, चित्रनगरी, वाहतुकीची समस्या अशा शहराच्या विकासाशी जोडलेला प्रत्येक प्रश्न सुटण्यासाठी ‘लोकमत’ने सातत्याने भूमिका मांडली आहे.
दैनंदिन इत्थंभूत बातम्यांसह ‘सखी मंच’, ‘युवा मंच’ आणि ‘बाल विकास मंच’च्या माध्यमातून ‘लोकमत’ सामाजिक, सांस्कृतिक उपक्रमदेखील राबवितो. कोल्हापूरच्या मातीशी नाळ जोडलेला ‘लोकमत’ आता वाचकांसाठी ‘फायदाच फायदा’ करणारी नवी योजना घेऊन आला आहे. आता दोन वर्षांसाठी ‘लोकमत’ची नवीन नोंदणी केल्यास आकर्षक भेटवस्तू आणि महाबचतीबरोबरच नियमित अंक असा तिहेरी फायदा होणार आहे. वाचकांचा फायदा होण्यासाठी ‘आता बस्स्’ ही वाचक योजना राबविली जात आहे. नवीन दोन वर्षांसाठीची अंक नोंदणी आणि ‘आता बस्स् २०१५’ या योजनेतील दुसऱ्या भेटवस्तूचे वाटप शहरातील १३ केंद्रांवरून केले जात आहे. वाचकांनी भरभरून पाठबळ दिल्यानेच ‘लोकमत’ने आता त्यांच्याच आग्रहाखातर अंकाच्या दोन वर्षे नोंदणीची सोयही उपलब्ध करून दिली आहे.
या योजनेतील भेटवस्तू नेण्यासाठी सकाळी नऊ वाजल्यापासून बहुतांश सर्वच केंद्रांवर वाचकांची अक्षरश: झुंबड उडत आहे. शहरातील सर्वच केंद्रांबाहेर रांगा लावून वाचकांनी नवीन दोन वर्षांची नोंदणीही केली.‘लोकमत’ने यापूर्वीच दिलेले गिफ्ट कुपन क्रमांक दोन व ओळखपत्राची झेरॉक्स जमा करून भेटवस्तू न्यावी. तसेच दोन वर्षांसाठी नूतन नोंदणी करताना ओळखपत्राची झेरॉक्स, वितरकाचे नाव व मोबाईल नंबरसह नोंदणी फॉर्म भरून द्यावा, असे आवाहन व्यवस्थापनाच्यावतीने करण्यात आले आहे.
कोल्हापूरमध्ये ‘लोकमत’ची आवृत्ती सुरू झाल्यापासून मी ‘लोकमत’चा वाचक आहे. ‘लोकमत’ वृत्तपत्र वाचकांसाठी नेहमी नवनवीन उपक्रम राबवते हे कौतुकास्पद आहे. या नवीन योजनेमुळे वाचकांचा ज्ञानासोबत आर्थिक फायदा होत आहे.
- दीपक भोसले-पाटील
वाचकांना मिळणार तिहेरी फायदा
दुसऱ्या भेटवस्तू वाटपाच्या दुसऱ्या दिवशी अर्थात रविवारी शहराच्या विविध भागांतील १३ केंद्रांवर दिवसभर गर्दी
वाचकांच्या विश्वासाच्या बळावर कोल्हापूरमध्येही ‘लोकमत’चे मानाचे स्थान
‘सखी मंच’, ‘युवा मंच’ आणि ‘बाल विकास मंच’च्या माध्यमातून ‘लोकमत’चे सामाजिक, सांस्कृतिक उपक्रम
दोन वर्षांसाठी ‘लोकमत’ची नवीन नोंदणी केल्यास आकर्षक भेटवस्तू आणि महाबचतीबरोबरच नियमित अंक असा तिहेरी फायदा