मेले तरी बेहत्तर, पण तडजोड करणार नाही : ममता बॅनर्जी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 4, 2019 07:41 PM2019-02-04T19:41:02+5:302019-02-04T19:44:17+5:30
शारदा चिटफंड घोटाळाप्रकरणी तपास अधिकारी आणि कोलकाताचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांच्या चौकशीसाठी गेलेल्या सीबीआयच्या पथकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावरून देशभरात वातावरण तापले आहे.
कोलकाता : शारदा चिटफंड घोटाळाप्रकरणी तपास अधिकारी आणि कोलकाताचे पोलिस आयुक्त राजीव कुमार यांच्या चौकशीसाठी गेलेल्या सीबीआयच्या पथकाला पोलिसांनी ताब्यात घेतल्यावरून देशभरात वातावरण तापले आहे. यातच मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी पोलिसांच्या एका कार्यक्रमामध्ये 'मेले तरी बेहत्तर, पण तडजोड करणार नाही, टीएमसी नेत्यांना केंद्राने पकडले तेव्हा रस्त्यावर उतरले नव्हते, पण राज्याच्या राजधानीच्या पोलीस आयुक्तांच्या खुर्चीचा अपमान झाल्याने संतप्त झाले आहे.' असे म्हटले आहे.
West Bengal CM Mamata Banerjee: I am ready to give my life but not compromise. I did not take to the streets when you touched TMC leaders. But I am angry when they tried to insult the chair of the Kolkata Police Commissioner, he is leading the organisation. pic.twitter.com/XhI0uEhpu5
— ANI (@ANI) February 4, 2019
ममता बॅनर्जी यांनी धरणे आंदोलनातून राज्याच्या पोलिसांच्या एका कार्यक्रमाला भेट दिली. यावेळी कोलकाता पोलिस आयुक्त राजीव कुमारही उपस्थित होते.
West Bengal CM Mamata Banerjee attend a West Bengal Police and Kolkata Police event. Kolkata Police Commissioner Rajeev Kumar also present. pic.twitter.com/zyFgfzJwHa
— ANI (@ANI) February 4, 2019
दरम्यान, सीबीआयने पश्चिम बंगालचे मुख्य सचिव, पोलिस महासंचालक, कोलकाता पोलिस आयुक्तांविरोधात दिल्ली उच्च न्यायालयामध्ये न्यायालयाने दिलेल्या आदेशाचा अवमान केल्याची याचिका दाखल केली आहे. या याचिकेवर उद्या सुनावणी होणार आहे.
Three-judge SC bench comprising Chief Justice Ranjan Gogoi, Justice Deepak Gupta & Justice Sanjiv Khanna will hear CBI’s pleas tomorrow against Kolkata Police Commissioner Rajeev Kumar & West Bengal govt for alleged non-cooperation in a case connected with Saradha chit fund scam. https://t.co/7VEDbD6s10
— ANI (@ANI) February 4, 2019
CBI has filed a contempt plea in the Supreme Court against West Bengal's Chief Secretary, Director General of Police and Kolkata Police Commissioner for wilful and deliberate violation of apex court's orders. pic.twitter.com/iA5oHKPLtb
— ANI (@ANI) February 4, 2019