उत्तराखंडमधील हाहाकाराचे खरे कारण!
By ऑनलाइन लोकमत | Published: March 7, 2021 06:37 AM2021-03-07T06:37:30+5:302021-03-07T06:38:00+5:30
आंतरराष्ट्रीय अभ्यासकांच्या अहवालात मांडण्यात आले तथ्य
लोकमत न्यूज नेटवर्क
महिनाभरापूर्वी, ७ फेब्रुवारी रोजी, उत्तराखंडातील चमोली जिल्ह्यात हिमकडा कोसळून निर्माण झालेल्या जलप्रपातामुळे ७० जणांचा मृत्यू झाला तर १३४ जण बेपत्ता झाले. एक संपूर्ण जलविद्युत प्रकल्पच या प्रपातामुळे उद्ध्वस्त झाला. चमोलीतील या दुर्घटनेमुळे अनेक विवाद निर्माण झाले. हिमालयाच्या कुशीतील बदलते भूस्तर, वातावरणातील बदल वगैरे सर्व मुद्द्यांवर चर्चाही झडली. मात्र, या सर्व विद्ध्वंसाला अश्मप्रपात अर्थात मोठा खडक कोसळणे कारणीभूत ठरल्याचे अभ्यासाअंती स्पष्ट झाले आहे.
दुर्घटना काय आणि कुठे घडली उत्तराखंडमधील चमोली जिल्ह्यात धौलीगंगा नदी परिसरात दुर्घटना घडली. हिमकडा नदीत कोसळून नदीला अचानक पूर आला. त्यात अनेकजण वाहून गेले
काय म्हणतो अभ्यास अहवाल
एवढा मोठा प्रपात शिखराखाली दरीत आदळला तेव्हा त्या ठिकाणच्या डेब्रिजला गती मिळाली
पाणी, दगड, बर्फ आणि माती यांचे मिश्रण तयार होऊन एक मोठा लोंढा तयार झाला. तो झपाट्याने पुढे गेला.
दगड आणि बर्फ यांचे मिश्रण असलेल्या या प्रपाताची ऊर्जा २२ दशलक्ष क्युबिक मीटर एवढी होती
हवामान बदलातील तज्ज्ञ अरुण भक्तश्रेष्ठ यांच्या नेतृतत्वाखालील सातजणांच्या पथकाने या दुर्घटनेचा अभ्यास केला.