जगासमोर खरेखुरे आव्हान दहशतवादाचे : सुषमा स्वराज

By admin | Published: October 19, 2016 05:02 AM2016-10-19T05:02:15+5:302016-10-19T05:02:15+5:30

परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी परिषदेच्या कामकाजात दहशतवादाचा ठळकपणे उल्लेख झाला, असे म्हटले.

The real challenge to the world is terrorism: Sushma Swaraj | जगासमोर खरेखुरे आव्हान दहशतवादाचे : सुषमा स्वराज

जगासमोर खरेखुरे आव्हान दहशतवादाचे : सुषमा स्वराज

Next


नवी दिल्ली- सीमेपलीकडून होणाऱ्या दहशतवादाचा उल्लेख ब्रिक्स देशांच्या परिषदेच्या जाहीरनाम्यात एकमताने करून घेण्यात भारताला अपयश आल्याची टीका होत असली तरी परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी परिषदेच्या कामकाजात दहशतवादाचा ठळकपणे उल्लेख झाला, असे म्हटले.
दहशतवाद जगासमोर खऱ्या अर्थाने आव्हान असल्याची मान्यता आहे. ब्रिक्स देशांची ही शिखर परिषद झाल्यानंतर स्वराज म्हणाल्या,
‘‘एखाद्या देशाचा दहशतवादाला पाठिंबा असणे आणि दहशतवादाला देशाने संरक्षण देण्यापेक्षा कोणतेही आव्हान मोठे नाही.’’
या परिषदेत भारताने पाकिस्तानकडून दहशतवाद पसरवला जात असल्याचे आक्रमकपणे समोर आणले आहे. ज्यांनी दहशतवादाचे प्रायोजकत्व घेतले आणि दहशतवाद्यांना पाठिंबा व आश्रय दिला त्यांच्याकडून त्याचे मोल वसूल केले पाहिजे, असे सुषमा स्वराज यांनी म्हटले.

Web Title: The real challenge to the world is terrorism: Sushma Swaraj

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.