Raj Thackeray: ‘असली आ रहा है, नकली से सावधान’;शिवसेना-मनसेचा वाद पोहोचला अयोध्येत

By ऑनलाइन लोकमत | Published: May 8, 2022 05:33 AM2022-05-08T05:33:23+5:302022-05-08T05:33:57+5:30

भाजप खासदाराचीही राज यांच्याविरुद्ध बॅनरबाजी. बॅनरवर शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत.

‘Real is coming, beware of fake’; Shiv Sena-MNS Raj Thackeray dispute reaches Ayodhya | Raj Thackeray: ‘असली आ रहा है, नकली से सावधान’;शिवसेना-मनसेचा वाद पोहोचला अयोध्येत

Raj Thackeray: ‘असली आ रहा है, नकली से सावधान’;शिवसेना-मनसेचा वाद पोहोचला अयोध्येत

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यापूर्वी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे अयोध्येत जाणार असतानाच आता शिवसेनेकडून ‘असली आ रहा है, नकली से सावधान’ असे बॅनर अयोध्येत फडकविण्यात आले आहेत. यानिमित्ताने शिवसेना - मनसेमधील वाद हा थेट अयोध्येत पोहोचला आहे. 

बॅनरवर शिवसेनाप्रमुख स्व. बाळासाहेब ठाकरे, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांचे फोटो आहेत. राज यांनी सध्या हिंदुत्वाचा अजेंडा हाती घेतला आहे. दोन पक्षांमध्ये हिंदुत्वावरून आरोप-प्रत्यारोप होत आहेत. राज यांची हिंदुत्वाची भूमिका नकली असल्याचे शिवसेनेने या बॅनरमधून सूचित केले.

आदित्य यांच्या अयोध्या दौऱ्याची तारीख अद्याप जाहीर झालेली नाही. मात्र राज यांच्या पूर्वी ते अयोध्येला धडकणार आहेत. भाजपच्या स्थानिक नेत्यांकडून राज यांच्या माफीनाम्याचे मागणी केली जात असताना आता शिवसेनेने राज यांच्या हिंदुत्वावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे.

माफी मागण्यावरून वाद उफाळला
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उत्तर भारतीयांची माफी मागितली नाही तर त्यांना अयोध्येत येऊ देणार नाही, असा इशारा भाजपचे खासदार ब्रिजभूषण सिंह यांनी दिला असतानाच आता याच मागणीचे बॅनर अयोध्येत जागोजागी झळकले आहेत. राज हे ५ जून रोजी अयोध्येला जाणार आहेत. खा. ब्रिजभूषण सिंह यांनी राज यांना इशारा दिलेला होता, पण उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्यांना फोन करून समजावले असून, आता ते शांत झाले आहेत, असा दावा मनसेचे नेते अभिजीत पानसे यांनी दोन दिवसांपूर्वी केला.

राज यांना अयोध्येत येण्यापासून रोखणार
ब्रिजभूषण सिंह यांच्या समर्थकांनी आता राज यांच्याविरोधात अयोध्येत बॅनर युद्ध छेडले आहे. खा. सिंह यांनी ५ जूनला ‘चलो अयोध्या’ अशी हाक दिली आहे. त्यादिवशी राज यांना अयोध्येत येण्यापासून रोखले जाईल, असेही त्यांनी बजावले आहे. राज हे उत्तर भारतीयांची हात जोडून माफी मागत नाहीत, तोवर योगी आदित्यनाथ यांनी त्यांना भेटू नये. ठाकरे कुटुंबाचा राम मंदिर आंदोलनाशी काडीचाही संबंध नव्हता. रा. स्व. संघ आणि विश्व हिंदू परिषदेचेच योगदान आंदोलनात होते, असे ब्रिजभूषण सिंह यांनी समाजमाध्यमात म्हटले आहे.

Web Title: ‘Real is coming, beware of fake’; Shiv Sena-MNS Raj Thackeray dispute reaches Ayodhya

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.