फोटोग्राफरनं पोझसाठी नवरीला केला स्पर्श, नवरदेवानं दिली थापड; असं आहे 'त्या' व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य!
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 9, 2021 20:47 IST2021-02-09T20:45:24+5:302021-02-09T20:47:43+5:30
हा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला होता. यानंतर तो लाखो लोकांनी पाहिला. एवढेच नाही, तर हा व्हिडिओ खरा आहे, की फेक हेदेखील अनेकांना जाणून घेण्याची इच्छा आहे.

फोटोग्राफरनं पोझसाठी नवरीला केला स्पर्श, नवरदेवानं दिली थापड; असं आहे 'त्या' व्हायरल व्हिडिओ मागचं सत्य!
नवी दिल्ली - सोशल मिडियावर नुकताच एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये फोटोशूट करताना फोटोग्राफर वारंवार एका नवरीला स्पर्ष करत आहे. यावर नाराज झाल्याने नवरदेव त्या फोटोग्राफरला थापड मारतो आणि रागात म्हणतो, दुरून फोटो घेता येत नव्हता का? (Real story about Viral video groom slap photographer)
फोटोग्राफरला थापड पडल्यानंतर नवरी स्टेजवरच जोर जोरात हसायला लागते. हा व्हिडिओ सोशल मिडियावर शेअर करण्यात आला होता. यानंतर तो लाखो लोकांनी पाहिला. एवढेच नाही, तर हा व्हिडिओ खरा आहे, की फेक हेदेखील अनेकांना जाणून घेण्याची इच्छा आहे.
या व्हायरल व्हिडिओचे सत्य आता समोर आले आहे. खरे तर, हा व्हिडिओ एका चित्रपटाच्या शूटिंगचा भाग आहे. छत्तीसगडची एक अभिनेत्री अनिक्रिती चौहानने कमेंट सेक्शनमध्ये, 'हा माझ्या मूव्ही शूटिंगदरम्यानचा व्हिडिओ आहे,' असे लिहिले आहे.
VIDEO : स्टेजवर नवरदेवाचा कारनामा पाहून आऊट ऑफ कंट्रोल झाली नवरी, लोक म्हणाले - 'बस्स अशीच बायको हवी'
या व्हिडिओतील नवरीच्या हासण्यावरही लोक विविध प्रकारच्या कमेंट्स करत आहेत. हा व्हिडिओ अनेक वेळा री-ट्विटदेकील करण्यात आला आहे. हा व्हिडिओ 'डार्लिंग प्यार झुकता नहीं' नावाच्या चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान रेकॉर्ड करण्यात आला होता. हा व्हिडिओ सोशल मिडियावर पोस्ट करताच तो मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाला.
पाहा व्हिडिओ -
ये लडक़ी पागल है पागल है, पागल है 🤣😂pic.twitter.com/wg9NGXR6da
— Vikrant ~ विक्रांत (@vikrantkumar) February 5, 2021