पुलवामा हल्ल्यात खरंच 40 जवान शहीद झाले? फारुख अब्दुलांची जीभ घसरली

By ऑनलाइन लोकमत | Published: March 31, 2019 10:14 AM2019-03-31T10:14:28+5:302019-03-31T10:17:48+5:30

 पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड आत्मघातील हल्ल्यावरून सुरू झालेल्या राजकारणाने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जोर पकडला आहे.

Really 40 CRPF person martyred in Pulwama? - Farooq Abdullah | पुलवामा हल्ल्यात खरंच 40 जवान शहीद झाले? फारुख अब्दुलांची जीभ घसरली

पुलवामा हल्ल्यात खरंच 40 जवान शहीद झाले? फारुख अब्दुलांची जीभ घसरली

googlenewsNext

श्रीनगर -  पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड आत्मघातील हल्ल्यावरून सुरू झालेल्या राजकारणाने लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान जोर पकडला आहे. दरम्यान, जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशन काँन्फ्रन्सचे नेते फारुख अब्दुल्ला यांनी केंद्र सरकारवर टीका करताना पुलवामा हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या संख्येवरच संशय व्यक्त केला आहे.  

केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीका करताना फारुख अब्दुल्ला म्हणाले की, मोदी सरकारने खऱ्या मुद्द्यांवरील लक्ष्य हटवण्यासाठी पाकिस्तानसोबत युद्घजन्य परिस्थिती निर्माण केली आहे. छत्तीसगडमध्ये देशाचे कित्येक जवान शहीद झाले आहेत. पण मोदी कधीही त्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी गेले नाहीत. त्यांच्या कुटुंबीयांना भेटण्यासाठीही गेले नाहीत. पुलवामा येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात 40 जवान शहीद झाल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र मला त्याबाबत शंका आहे.'' 

नॅशनल काँन्फ्रन्स आणि काँग्रेस काश्मीरमध्ये आघाडी करून निवडणूक लढवत आहेत. दरम्यान, फारुख अब्दुल्ला हे श्रीनगर येथून लोकसभा निवडणूक लढवत असून, तेथे कार्यकर्त्यांना संबोधित करताना त्यांनी हे वक्तव्य केले. ''बालाकोट येथे करण्यात आलेल्या हवाई हल्ल्यात मोठ्या प्रमाणावर दहशतवादी मारले गेल्याचा दावा करण्यात येत आहे. कुणी तिथे 300, कुणी 500 तर कुणी 1 हजार दहशतवादी मारले गेल्याचा दावा करत आहेत. केवळ आम्ही किती शूर आहोत, ते दाखवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. संसदेच्या  अधिवेशनाच्या अखेरच्या काळात अनेक सदस्यांनी सांगितले होते की, मोदी सरकार सर्व मोर्चांवर अपयशी ठरले आहेत. त्यांच्याकडे सांगण्यासारखे काही नाही. त्यामुळे मुख्य मुद्द्यांपासून लोकांचे लक्ष्य हटवण्यासाठी ते युद्धजन्य परिस्थिती निर्माण करतील.'' असेही अब्दुल्ला यांनी पुढे सांगितले . 

 लोकसभेची निवडणूक ही भारताला वाचवण्याची लढाई असून, हा देश धर्मनिरपेक्ष राहील किंवा नाही, हे ही निवडणूक निश्चित करणार आहे. मोदींनी उपग्रहविरोधी क्षेपणास्राच्या चाचणीचे श्रेय घेतले. मात्र याची तयारी मनमोहन सिंह यांच्याच कार्यकाळात झाली होती. पण मनमोहन सिंह यांची त्यांची घोषणा केली नव्हती.  

Web Title: Really 40 CRPF person martyred in Pulwama? - Farooq Abdullah

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.