नगरसेवकांचे बंड काही तासातच शमले

By admin | Published: June 1, 2016 08:54 PM2016-06-01T20:54:33+5:302016-06-01T20:54:33+5:30

जळगाव : महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या समर्थनार्थ महापालिकेतील १७ नगरसेवकांनी पुकारलेले राजीनामा नाट्य अवघ्या तीन तासात मागे घेण्यात आले.

The rebellion of the corporators came in few hours | नगरसेवकांचे बंड काही तासातच शमले

नगरसेवकांचे बंड काही तासातच शमले

Next
गाव : महसूल मंत्री एकनाथराव खडसे यांच्या समर्थनार्थ महापालिकेतील १७ नगरसेवकांनी पुकारलेले राजीनामा नाट्य अवघ्या तीन तासात मागे घेण्यात आले.
महापालिकेतील विरोधी पक्षनेते वामनराव खडके यांच्या नेतृत्वाखाली पक्षाचे १६ नगरसेवक दुपारी ३ वाजता अजिंठा विश्रागृहात एकत्र आले होते. पक्षाने महसूल तथा पालकमंत्री एकनाथराव खडसे यांची पूर्ण पाठराखण करावी. याप्रश्नी अन्य नेते मौन पाळून आहेत. म्हणून हे नगरसेवक २ रोजी प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांना मुंबईत भेटणार होते व त्यांच्याकडे आपल्या पदाचा राजीनामा देणार होते. मात्र दुपारी पालकमंत्री एकनाथराव खडसे हे जळगावी आल्यानंतर त्यांनी असे प्रकार करू नयेत असे सांगितल्यानंतर हे बंड अवघ्या तीन तासात संपले व मुंबईला जाण्याचा निर्णयही या सदस्यांनी रद्द केला.

Web Title: The rebellion of the corporators came in few hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.