राजस्थानात बंडखोर नेत्यांमुळे भाजपपुढे अडचणी वाढल्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 05:31 AM2018-09-26T05:31:18+5:302018-09-26T05:31:34+5:30

राजस्थानातील सत्ताधारी भाजपला आगामी विधानसभा निवडणुकांत पक्षातील बंडखोरीमुळे मोठा फटका बसण्याची किंवा पराभवाला सामोरे जावे लागण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे.

 Rebellious leaders in Rajasthan have raised issues due to the BJP | राजस्थानात बंडखोर नेत्यांमुळे भाजपपुढे अडचणी वाढल्या

राजस्थानात बंडखोर नेत्यांमुळे भाजपपुढे अडचणी वाढल्या

Next

जयपूर  - राजस्थानातील सत्ताधारी भाजपला आगामी विधानसभा निवडणुकांत पक्षातील बंडखोरीमुळे मोठा फटका बसण्याची किंवा पराभवाला सामोरे जावे लागण्याचीही शक्यता वर्तविण्यात येत आहे. मुख्यमंत्री वसुंधराराजे यांच्या कार्यशैलीवर भाजपचे अनेक नेते व कार्यकर्ते नाराज असून, काही जणांनी पक्ष सोडायलाही सुरुवात केली आहे.
ज्येष्ठ नेते जसवंत सिंह यांचे पुत्र व बारमेर जिल्ह्यातील आमदार मानवेंद्र सिंह यांनी पदाचा व भाजपच्या सदस्यात्वाचाही राजीनामा दिला. याआधी घनश्याम तिवारी, हनुमान बेनिवाल, किरोडीसिंह बैन्सला या नेत्यांनी सर्व पदांचा राजीनामा दिला होता. निवडणुकीत हे बंडखोर नेते काँग्रेसपेक्षा भाजपचीच मते खाण्याचा जास्त धोका आहे.
गेल्या लोकसभा निवडणुकीत माजी केंद्रीय मंत्री जसवंतसिंह यांना बारमेर येथून भाजपने उमेदवारी नाकारली होती. ती गोष्ट मनाला लागलेले त्यांचे पुत्र मानवेंद्र सिंह यांनी आगामी लोकसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून निवडणूक लढविण्याचे जाहीर केले आहे. राजघराण्याची पार्श्वभूमी व राजपूत समाजाचा असलेला भक्कम पाठिंबा ही मानवेंद्र सिंह यांची बलस्थाने आहेत. (वृत्तसंस्था)

हे देऊ शकतात त्रास

सहा वेळा भाजपचे आमदार असलेले व दोनदा मंत्रिपद भूषविलेले घनश्याम तिवारी जूनमध्ये पक्षातून बाहेर पडले. त्यांनी भारत वाहिनी सेना नावाचा पक्ष स्थापन केला आहे.
ब्राह्मण समाजातील प्रभावी नेते असलेल्या तिवारी यांची सिकर व जयपूर परिसरावर चांगलीच राजकीय पकड आहे. वसुंधराराजे यांच्याशी तीव्र मतभेद झाल्याने नागौर येथील जाट समाजाचे नेते हनुमान बेनिवाल यांनीही भाजपचा त्याग केला.

देशभर २००८ साली गाजलेल्या गुज्जर आंदोलनातील नेते किरोडीसिंह बैन्सला यांनी २००९ मध्ये भाजपच्या तिकिटावर लोकसभा लढविली होती; पण ते पराभूत झाले. त्यानंतर ते या पक्षापासून कायमचेच दुरावले. हे चार व आणखी बंडखोर नेते आगामी विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपला वात आणणार, असे राजकीय विश्लेषकांना वाटते.

Web Title:  Rebellious leaders in Rajasthan have raised issues due to the BJP

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.