बंडखोर गुवाहाटीकडे रवाना? रात्री २.१६ वा. सोडले हॉटेल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2022 03:36 AM2022-06-22T03:36:56+5:302022-06-22T03:37:51+5:30
एकनाथ शिंदे ह्यांच्यासह ३५ आमदारांनी बुधवारी रात्री तीन वाजेच्या सुमाराला विमानाने आसाममधील गुवाहाटीकडे प्रयाण केल्याची माहिती आहे.
रमांकांत पाटील
सुरत :एकनाथ शिंदे ह्यांच्यासह ३५ आमदारांनी बुधवारी रात्री तीन वाजेच्या सुमाराला विमानाने आसाममधील गुवाहाटीकडे प्रयाण केल्याची माहिती आहे. ही विमाने गुवाहाटी कडे जाणार असल्याची माहिती विमानतळ सुत्रांनी दिली.
दिवसभर रंगलेल्या नाट्यानंतर बुधवारी मध्यरात्रीनंतर २ वा. १६ मिनिटांनी या आमदारांनी हॉटेल सोडले आणि खास व्यवस्था केलेल्या बसेसमधून विमानतळाकडे प्रयाण केले. विमानतळाकडे प्रयाण करताना ‘लोकमत’ प्रतिनिधीशी बंडखोरांचे नेते एकनाथ शिंदे प्रतिक्रिया देताना म्हणाले की, शिवसेना आमदारांनी कोणतेही बंड केलेले नाही. मुख्यमंत्र्यांशी माझी चर्चा झालेली आहे. बाळासाहेबांचे विचार आणि दिघे साहेबांची शिकवण सार्थ ठरविणार. ‘गर्व से कहो, हम हिंदू है!’ या आमदारांसोबत भाजपचे मोहित कंबोज व संजय कुटे हेसुद्धा होते.