मोहाडी रस्त्यावर पुन्हा घरफोडी
By admin | Published: September 26, 2016 12:37 AM2016-09-26T00:37:16+5:302016-09-26T00:37:16+5:30
जळगाव: मोहाडी रस्त्यावर असलेल्या विनोबा नगरातील स्वातंत्र्य सैनिक गृहनिर्माण संस्थेत चोरट्यांनी रमेश भारतीया यांच्या मालकीचे बंद घराचा दरवाजा तोडून ऐवज लुटून नेला आहे. रविवारी ही घटना उघडकीस आली. घरमालक पुणे येथे गेलेले असल्याने नेमका काय ऐवज चोरी गेला हे कळू शकले नाही. घरमालक आल्यावरच मुद्देमालाचा उलगडा होईल. याप्रकरणी सध्या तरी गुन्हा दाखल झालेला नाही.
Next
ज गाव: मोहाडी रस्त्यावर असलेल्या विनोबा नगरातील स्वातंत्र्य सैनिक गृहनिर्माण संस्थेत चोरट्यांनी रमेश भारतीया यांच्या मालकीचे बंद घराचा दरवाजा तोडून ऐवज लुटून नेला आहे. रविवारी ही घटना उघडकीस आली. घरमालक पुणे येथे गेलेले असल्याने नेमका काय ऐवज चोरी गेला हे कळू शकले नाही. घरमालक आल्यावरच मुद्देमालाचा उलगडा होईल. याप्रकरणी सध्या तरी गुन्हा दाखल झालेला नाही. अनंत चतुर्थदशीच्या दिवशी याच रस्त्यावर सर्वत्र गणेश विसर्जनाची धामधूम सुरु असताना गणपती विसर्जनासाठी आल्याची सांगून दोन चोरट्यांनी हेंमत चुडामन पाटील (वय ३६, रा.बालाजी हाईट्स) यांच्या बंद घराचा दरवाजा तोडून चोरट्यांनी एक लाख ९५ हजार रुपये रोख व ६० हजार रुपये किमतीचे तीन तोळ्याचे मंगळसूत्र असा दोन लाख ५५ हजार रुपयांचा ऐवज चोरुन नेल्याची घटना घडली होती. या दहा दिवसातील ही दुसरी घटना आहे.घरमालक मुलांकडे गेले पुण्यालारमेश भारतीया हे सोसायटीतील ३१ क्रमांकाच्या प्लॉटमध्ये पत्नीसह वास्तव्याला आहेत. त्यांची मुले पुणे येथे स्थायिक असल्याने ते पंधरा दिवसापूर्वीच त्यांच्याकडे गेले आहे. घर सतत बंद असल्याचे हेरुन चोरट्यांनी घरात हातसाफ केला आहे. मागील दरवाजा तोडून चोरट्यांनी घरात प्रवेश केला आहे. घरात साफसफाईसाठी आलेल्या कर्मचार्याला चोरी झाल्याचे लक्षात आले. त्याने शेजारच्यांना ही माहिती दिली. एमआयडीसी पोलिसांना घटनेची माहिती दिल्यानंतर त्यांनीही पाहणी केली. घरात सामान तसेच कपाटाची नासधूस करण्यात आली आहे.मागील घटनेत वृध्देने टोकले होते चोरट्यांना अनंत चतुर्थदशीच्या दिवशी झालेल्या घरफोडीच्या वेळी बालाजी हाईटस या अपार्टमेंटमध्ये वॉचमन डिंगबर यांच्या सासू पार्वताबाई मुरुम यांनी चोरट्यांना तुम्ही कोण व कुठे चाललात असे विचारले असता त्यांनी येथे आमचे नातेवाईक आहेत आम्ही गणपती विसर्जनासाठी आल्याचे त्यांनी सांगितले होते. या इमारतीत सध्या कोणीच नाही सर्व जण विसर्जनालाच गेले आहेत असे सांगितले असता दोघं जण परत जाण्याचा बहाणा करुन कोपर्यात गेले. वृध्देचे लक्ष विचलित करुन ते इमारतीत चढले होते. ही घटनाही त्याच दिवशी घडली असावी अशीही शक्यता आहे.