पंजाब बाहेर रहाण्यासाठी पैशांची ऑफर मिळाली - नवज्योत सिंग सिद्धू
By admin | Published: September 8, 2016 03:59 PM2016-09-08T15:59:16+5:302016-09-08T15:59:16+5:30
पंजाबमध्ये बादलांसाठी प्रचार करायला सांगितला म्हणून राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला असे सिद्धूंनी सांगितले.
Next
ऑनलाइन लोकमत
चंदीगड, दि. ८ - पंजाबमध्ये बादलांसाठी प्रचार करायला सांगितला म्हणून राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला. आम आदमी पक्ष किंवा अरविंद केजरीवाल राज्यसभा सोडण्याचं कारण नसल्याच नवज्योत सिंग सिद्धू यांनी गुरुवारी पत्रकारपरिषदेत सांगितलं.
आवाज ए पंजाब या आपल्या पक्षाची त्यांनी औपचारीक घोषणा यावेळी केली. फक्त पंजाबच्या विकासासाठी आपण नवीन पक्ष स्थापन केला आहे. समृद्ध पंजाब हाच आपल्या नव्या पक्षाचा मुख्य उद्देश असल्याचं त्यांनी सांगितलं.
सरकार लोकांसाठी असते पण पंजाबमध्ये सरकार फक्त एका कुटुंबासाठी आहे असा आरोप त्यांनी केला. मागच्या दोनवर्षांपासून आपच नेते आपल्या संपर्कात होते असे सिद्धू यांनी सांगितले.
सिद्धूच्या पत्रकार परिषदेतील मुद्दे
पंजाबमध्ये बादलांसाठी प्रचार करायला सांगितला म्हणून राज्यसभा खासदारकीचा राजीनामा दिला.
आम आदमी पक्ष किंवा अरविंद केजरीवाल राज्यसभा सोडण्याचे कारण नाही.
पंजाबच्या बाहेर रहाण्यासाठी पैशांची ऑफर मिळाली.
सरकार लोकांसाठी असले पाहिजे, पण पंजाबमध्ये एक घराण्यासाठी सर्वकाही चालते.
आमची लढाई राजकीय पक्षांविरुद्ध नाही, पण पक्ष चालवणा-यांविरुद्ध आहे.
पंजाबमध्ये एका कुटुंबाचे सरकार आहे.
पंजाबचे नुकसान करणा-या व्यवस्थेला आम्हाला हलवून सोडायचे आहे, चांगले नेते कमी होऊन मूकदर्शक झाले आहेत.
राजकारणातील माझी बारावर्ष लोकांच्या सेवेची होती, त्यात कुठला व्यक्तीगत फायदा, काही मिळवण्याचा हेतू नव्हता, पंजाब जिंकावा हीच माझी इच्छा आहे.
क्रीडापटू तयार करणारा पंजाब कुठे गेला ?, पंजाबचे रस्ते ड्रग अॅडीक्टसनी भरले आहेत.
त्रस्त जनतेला दिलासा देणं हा आपल्या पक्षाचा मुख्य उद्देश आहे.
चांगल्या लोकांना शोपीस बनवून ठेवण्याची भारतात परंपरा आहे, फक्त प्रचारासाठी त्यांचा वापर केला जातो.
राजकारणात प्रामाणिक माणसाचं डेकोरेशन बनवून ठेवतात.
पंजाबला समृद्ध करणे हा आवाज ए पंजाबचा मुख्य उद्देश आहे.