तुमच्या सोशल मीडियातील पोस्टवरही प्राप्तिकरचा ‘डोळा’!, काळा पैसा हुडकण्यासाठी आता नवीन मार्ग  

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2017 04:22 AM2017-09-11T04:22:56+5:302017-09-11T04:23:04+5:30

नवी कोरी आलिशान मोटार घेतली किंवा परदेशातून येताना एखादे महागडे मनगटी घड्याळ आणले की त्याचे फोटो लगेच ‘फेसबूक’ किंवा ‘इन्स्टाग्राम’ यासारख्या सोशल मीडियातून शेअर करण्याची सवय यापुढे तुमच्या अंगलट येऊ शकते. कारण प्राप्तिकर विभाग काळा पैसा हुडकण्याचा एक मार्ग म्हणून आता सोशल मीडियावर ‘डोळा’ ठेवणार आहे.

 The recipient of 'eye' on your social media posts! Now, new ways to get rid of black money | तुमच्या सोशल मीडियातील पोस्टवरही प्राप्तिकरचा ‘डोळा’!, काळा पैसा हुडकण्यासाठी आता नवीन मार्ग  

तुमच्या सोशल मीडियातील पोस्टवरही प्राप्तिकरचा ‘डोळा’!, काळा पैसा हुडकण्यासाठी आता नवीन मार्ग  

Next

नवी दिल्ली : नवी कोरी आलिशान मोटार घेतली किंवा परदेशातून येताना एखादे महागडे मनगटी घड्याळ आणले की त्याचे फोटो लगेच ‘फेसबूक’ किंवा ‘इन्स्टाग्राम’ यासारख्या सोशल मीडियातून शेअर करण्याची सवय यापुढे तुमच्या अंगलट येऊ शकते. कारण प्राप्तिकर विभाग काळा पैसा हुडकण्याचा एक मार्ग म्हणून आता सोशल मीडियावर ‘डोळा’ ठेवणार आहे. तुम्ही समाजमाध्यमांवर केलेले श्रीमंतीचे प्रदर्शन आणि प्रत्यक्षात भरलेले प्राप्तिकर रिटर्न यांचा ताळमेळ बसत नसेल तर तुमच्या मागे ‘आयटी’ विभागाचा झक्कू लागू शकेल.
काळा पैसा हुडकण्यासाठी गुपचूप धांडोळा घेण्याची ‘आॅपरेशन इन्साइट’ ही नवी मोहीम पुढील महिन्यापासून सुरु होईल, असे प्राप्तिकरच्या वरिष्ठ अधिकाºयाने सांगितले. यात कर अधिकारी करदात्याला समोरासमोर जाब न विचारता ‘बिग डेचा अ‍ॅनॅलिटिक्स’ या अत्याधुनिक तंत्राचा वापर करून सकृद्दर्शनी संशयाच्या घेºयात असलेले करदाते अधी हुडकून काढेल.
करदात्याला पॅनकार्ड ‘आधार’शी लिंक करणे सक्तीचे केल्याने त्या व्यक्तीचे उत्पन्न व मालमत्ता यांचे समग्र चित्र प्राप्तिकर विभागास उपलब्ध होणार आहे.

क्लीन मनीनंतर आता आॅपरेशन इन्साइट
बेहिशेबी मालमत्ता हुडकून काढून ती करआकारणीच्या कक्षेत आणण्यासाठी सरकारने हाती घेतलेल्या ‘आॅपरेशन क्लीन मनी’
या व्यापक योजनेचाच ‘आॅपरेशन इन्साइट’ हा पुढचा टप्पा असेल.

असे आहे मोहीमेचे स्वरूप
‘डेटा अ‍ॅनॅलिटिक्स’ तंत्राचा वापर
करून करदात्यांविषयी उपलब्ध असलेली माहिती शोधून काढणार.
संकलित माहितीची संगतवार जुळणी करून आणि त्या माहितीवर प्रक्रिया करून निष्कर्ष काढणे.

‘इन्साइट’ या इंग्रजी नावाप्रमाणे यात वरकरणी दिसणाºया माहितीच्या अधिक खोलात शिरून त्या पलिकडचे चित्र पाहण्याचा प्रयत्न केला जाईल. यामुळे कर विभागाला मोठ्या रकमांच्या व्यवहारांवर वेळीच लक्ष ठेवून त्यातून काळ््या पैसा केला जात असेल तर त्याला वेळीच प्रतिबंध करणे शक्य होईल.

सुरुवात कधी?
या मोहीमेसाठी प्राप्तिकर विभागाने गेल्या वर्षी एल अ‍ॅण्ड टी इन्फोटेक कंपनीशी तांत्रिक पाठबळ पुरविण्यासाठी करार केला होता. अधिकाºयाने सांगितले की, सध्या यासाठी उभारलेल्या यंत्रणेच्या चाचण्या सुरु असून प्रत्यक्ष मोहिमेची सुरुवात येत्या महिन्यापासून केली जाऊ शकेल, अशी आशा आहे.

स्वतंत्र प्रोसेसिंग सेंटर
खास ‘इंटेग्रेटेड प्लॅटफॉर्म’ तयार केला जात आहे. सर्व टप्प्यांचे काम एकाच ठिकाणी व्हावे यासाठी नवे ‘कम्प्लायन्स मॅनेजमेंट सेंट्रलाइज्ड प्रोसेसिंग सेंटरही उभारण्यात येणार आहे.
येथे प्राथमिक शहानिशा करणे, पुढील कारवाई करणे, मोठ्या संख्येने नोटिसा व पत्रे तयार करून ती संबंधितांना रवाना करणे व पाठपुरावा करणे इत्यादी कामे या सेंटरमध्ये होतील.

Web Title:  The recipient of 'eye' on your social media posts! Now, new ways to get rid of black money

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.