...अशी ओळखा 2000ची नोट !
By Admin | Published: November 16, 2016 10:02 PM2016-11-16T22:02:54+5:302016-11-16T22:05:00+5:30
आरबीआयनं या 2000च्या नोटेवर सिक्युरिटी फिचरही दिलं आहे.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली - 500 आणि 1000च्या नोटा बंद करण्याच्या निर्णयानंतर सरकारनं 500 आणि 2000च्या नव्या नोटा आणल्या आहेत. त्यातील 2000च्या नोटा बँकांमध्येही उपलब्ध झाल्या आहेत. मात्र 2000च्या बाजारात आलेल्या नोटा बनावट असण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळेच आरबीआयनं या 2000च्या नोटेवर सिक्युरिटी फिचरही दिलं आहे.
दरम्यान, या नव्या नोटेवर एक असे फिचर दिलं ज्याची चर्चा फार झाली नसल्यानं अनेकांना ते माहीत नाही. 2000च्या नोटेचं बारकाईनं निरीक्षण केल्यास तुम्हाला हे फिचर दिसेल. जर तुमच्याकडे 2000च्या नव्या नोटा असतील तर त्यावरील गांधीजींचा फोटो जरा काळजीपूर्वक पाहा. नव्या नोटेवरील गांधीजींच्या या फोटोत त्यांच्या चष्म्यावर आरबीआय असे बारीक अक्षरात लिहिले आहे. हे आतापर्यंतचे सर्वात सुरक्षित फिचर असल्याचा दावा 'आरबीआय'नं केला आहे. हे फिचर कॉपी करणेही कठीण असल्याचे सांगितले जात आहे.
- अशी आहे २००० रुपयांची नोट
- नोट हजारच्या नोटेपेक्षा छोटी आहे. दोन हजारच्या नोटेचा आकार १६६ ६६ मिमी आहे. तर जुन्या एक हजारच्या नोटेचा आकार १७७ ७३ मिमी होता. नोटेवर देवनागरी लिपीमध्येही २००० अशी संख्या देण्यात आली आहे. नोटेचा नंबर सुरुवातीपासून शेवटपर्यंत जाईपर्यंत मोठा होत जातो. प्रत्येक नंबरचा आकार बदलत जाणार असल्याने अशीच बनावट नोट तयार करणे अवघड जाणार आहे. नोट थोडी तिरपी केली की अनेक ठिकाणी २००० अशी संख्या दिसते.
- उजव्या बाजूला हिरव्या रंगात असलेली २००० ही संख्या नोट थोडी तिरपी केल्यानंतर निळ्या रंगाची दिसते. अशाच प्रकारे 'भारत' आणि 'आरबीआय' असेही रंग बदलणारी अक्षरे आहेत. अशोकस्तंभाचे चित्र डाव्या बाजूऐवजी उजव्या बाजूला दिले आहे.
- २००० असा आकडा डाव्या बाजूला खाली घेण्यात आला आहे.
- याआधीच्या सर्व चलनाच्या नोटांमध्ये महात्मा गांधी यांचे चित्र उजव्या बाजूला होते. ते आता मध्यभागी घेण्यात आले आहे.
- गांधीजींच्या चित्राच्या बाजूला दोन भाषांमध्ये रिझर्व्ह बँकेचा संदेश आणि गव्हर्नरची स्वाक्षरी आहे. हे अगोदर नोटेच्या खालच्या बाजूला असायचे.
- तर मागच्या बाजूला नोट छापली गेली त्या वर्षाचा उल्लेख डाव्या बाजूला करण्यात आला आहे.
- तीन ठिकाणी वेगवेगळ्या आकारांत नोटेचे मूल्य छापण्यात आले आहे.
- शिवाय इंग्रजीमध्येही two thousand rupees असे लिहिण्यात आले आहे.
- स्वच्छ भारतचा लोगो समाविष्ट करण्यात आला आहे.
- हत्ती, मोर, कमळ ही राष्ट्रीय चिन्हे आहेत. हत्ती हा राष्ट्रीय वारसा वन्यप्राणी, मोर राष्ट्रीय पक्षी तर कमळ हे राष्ट्रीय फुल आहे.
- चौदा भाषांमध्ये 'दोन हजार रुपये' असे लिहिलेले आहे.
- मोठ्या आकारात मंगळ यानाचे चित्र आहे.