सेन्सॉरशिपबाबत बेनेगल समितीने केल्या शिफारशी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 13, 2016 06:26 AM2016-06-13T06:26:49+5:302016-06-13T08:15:18+5:30

श्याम बेनेगल यांच्या समितीने सूचना आणि प्रसारण मंत्रालयाला चित्रपटाच्या सेन्सॉरशिपसंबंधी काही शिफारशी केल्या आहेत.

Recommendations made by the Benague Committee about censorship | सेन्सॉरशिपबाबत बेनेगल समितीने केल्या शिफारशी

सेन्सॉरशिपबाबत बेनेगल समितीने केल्या शिफारशी

Next


कोलकाता : श्याम बेनेगल यांच्या समितीने सूचना आणि प्रसारण मंत्रालयाला चित्रपटाच्या सेन्सॉरशिपसंबंधी काही शिफारशी केल्या आहेत. श्याम बेनेगल यांच्या नेतृत्वाखालील सेन्सॉर बोर्ड सुधार समितीचे एक सदस्य गौतम घोष यांनी ही माहिती दिली.
येथे भारत निर्माण पुरस्कार कार्यक्रमप्रसंगी वृत्तसंस्थेशी बोलताना घोष म्हणाले की, समितीने २६ एप्रिल रोजी आपला पहिला अहवाल दिला आहे. चित्रपट प्रमाणित करण्यासाठी एक संपूर्ण प्रणाली तयार करण्याची विनंती यात करण्यात आली आहे. यावर मंत्रालय काय निर्णय घेते ते पाहू, असेही ते म्हणाले. ‘उडता पंजाब’च्या वादावर प्रश्न उपस्थित केला असता घोष म्हणाले की, चित्रपटांना सेन्सॉरशिपची गरज नाही, पण चित्रपट प्रमाणित करण्याची पद्धत आणखी वेगळी असू शकते.

Web Title: Recommendations made by the Benague Committee about censorship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.