आमदाराच्या शिक्षा माफीसाठी शिफारस
By admin | Published: July 31, 2015 01:06 AM2015-07-31T01:06:55+5:302015-07-31T01:06:55+5:30
वीज अभियंत्याला केलेल्या मारहाण प्रकरणी सडा येथील तुरुंगात दोन महिन्यांपासून शिक्षा भोगणारे माजी मंत्री व नुवेचे (दक्षिण गोवा) आमदार मिकी पाशेको यांची उर्वरित शिक्षा माफ
Next
पणजी : वीज अभियंत्याला केलेल्या मारहाण प्रकरणी सडा येथील तुरुंगात दोन महिन्यांपासून शिक्षा भोगणारे माजी मंत्री व नुवेचे (दक्षिण गोवा) आमदार मिकी पाशेको यांची उर्वरित शिक्षा माफ करण्याची शिफारस राज्यपाल मृदुला सिन्हा यांना करावी, असा निर्णय गोवा मंत्रिमंडळाने गुरुवारी घेतला. वीज अभियंता कपिल नाटेकर यांना कामावर असताना स्वत:च्या कार्यालयात बोलावून पाशेको यांनी मारहाण केली होती. पाशेको यांना न्यायालयाने सहा महिने कैदेची शिक्षा ठोठावली आहे. मंत्रिमंडळाच्या निर्णयाविरोधात न्यायालयात आव्हान देणार असल्याचे उच्च न्यायालयाचे वकील आयरिश रॉड्रिग्ज यांनी सांगितले आहे.