आरक्षणाच्या भूमिकेचा फेरविचार व्हावा - मोहन भागवतांचा पुनरुच्चार

By admin | Published: October 14, 2015 02:01 PM2015-10-14T14:01:43+5:302015-10-14T14:01:43+5:30

देशाच्या आरक्षण धोरणाचा फेरविचार व्हावा या मताचा सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुनरुच्चार केला आहे.

Reconsideration of the role of reservation - Reconstruction of Mohan Bhagwat | आरक्षणाच्या भूमिकेचा फेरविचार व्हावा - मोहन भागवतांचा पुनरुच्चार

आरक्षणाच्या भूमिकेचा फेरविचार व्हावा - मोहन भागवतांचा पुनरुच्चार

Next
>ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. १४ - देशाच्या आरक्षण धोरणाचा फेरविचार व्हावा या मताचा सरसंघचालक मोहन भागवत यांनी पुनरुच्चार केला आहे. काही दिवसांपूर्वीच्या मोहन भागवतांच्या या वक्तव्यानंतर आरक्षणाबाबतचे सध्याचे धोरण बदलण्यात येणार नसल्याची ग्वाही पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपा अध्यक्ष अमित शाह यांना द्यावी लागली होती. बिहार निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर भाजपावर लगेच सारवासारव करण्याची वेळ आली होती. 
मात्र, गोरखपूर येथे संघ स्वयंसेवकांशी संवाद साधताना भागवत यांनी आपण आरक्षणाच्या विरोधात नाही, मात्र आरक्षणाचा फायदा ख-या गरजूंना मिळत नसल्याचे म्हटल्याचे वृत्त एका हिंदी दैनिकाने दिले आहे. त्यामुळे आरक्षण धोरणाचा फेरविचार व्हावा, त्याच्यावर चर्चा व्हावी आणि ज्यांना आरक्षणाची खरी गरज आहे त्यांनाच ते मिळेल याची काळजी घ्यावी अशी भूमिका भागवत यांनी मांडली आहे. 
भागवतांच्या गेल्या महिन्यातल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर व भाजपावर नितिशकुमारांनी जोरदार टीका केली होती आणि बिहारमध्ये निवडणुकांमध्ये राजकीय लाभ उठवण्याचा प्रयत्न केला होता. भाजपाने तात्काळ आरक्षण धोरणाचा फेरविचार करण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्टीकरण दिले होते. 
भाजपाच्या बिहारमधल्या सहकारी पक्षांची मदार मागासवर्गीय मतदात्यांवर असल्यामुळे आरक्षणला धक्का लावण्याची कोणतीही चर्चा भाजपाला बिहारमध्ये महाग पडू शकते. या पार्श्वभूमीवर भागवत यांच्या वक्तव्याला महत्त्व देण्यात येत आहे.

Web Title: Reconsideration of the role of reservation - Reconstruction of Mohan Bhagwat

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.