देशभरातल्या ब-याचशा भागात शुक्रवारी पडला विक्रमी पाऊस
By admin | Published: July 29, 2016 08:04 PM2016-07-29T20:04:54+5:302016-07-29T20:04:54+5:30
भारताच्या ब-याचशा भागात आज पावसानं रौद्ररूप धारणं केल्याचं पाहायला मिळालं.
ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 29 - भारताच्या ब-याचशा भागात आज पावसानं रौद्ररूप धारणं केल्याचं पाहायला मिळालं. गेल्या काही दिवसांपासून कोसळणा-या पावसामुळे अनेक भागात पूरस्थिती उद्भवल्यानं वाहतुकीची कोंडी झाली. गुडगाव आणि बंगळुरूमध्ये पावसानं सरासरीचा रेकॉर्ड ब्रेक केल्यानं काही प्रमाणात जनजीवनही विस्कळीत झालं.
गेल्या चार दिवसांपासून कोसळणा-या पावसानं अनेक सखल भागात पाणी साचले आहे. गुडगावमधल्या राष्ट्रीय महामार्ग क्र. ८ वर वाहतुकीची कोंडी झाल्यानंतर हजारो प्रवासी अडकले. दरम्यान, ही गर्दी आटोक्यात आणण्यासाठी गुडगावचे उपायुक्त टी. एम. सत्यप्रकाश यांनी हीरो होंडा चौकात कलम १४४ लागू केले आहे.
गुडगावमध्यल्या एमजी रोड, सुभाष चौक, सोहना रोड, पालम विहार, जुनी दिल्ली-गुडगाव रोड या भागात अतिवृष्टीमुळे दुपारपासून वाहतुकीची कोंडी झाली होती. यावेळी गुडगावमधील परिस्थिती पाणी साठल्यामुळे आणि काही नाल्यांचे काम न केल्यामुळे उद्भवली असल्याचं नायडू यांनी म्हटलं आहे. हैदराबादमध्येही मुसळधार पावसामुळे पूरस्थिती उद्भवली आहे.