मजूर संस्थांकडील 70 लाखांची वसुली करणार ( लेबर फेडरेशनला आर्थिक शिस्त लावण्याचे काम बँकेचे अध्यक्ष बाबा करांडे यांनी सुरू ठेवले आहे?????)

By admin | Published: February 17, 2016 02:00 AM2016-02-17T02:00:20+5:302016-02-17T02:00:20+5:30

बाबा करांडे; आर्थिक शिस्त लागल्याशिवाय संस्थेला भविष्य नाही

To recover 70 lakhs from laborers (Bank President Baba Karande has continued the job of disciplining the Labor Federation financially) | मजूर संस्थांकडील 70 लाखांची वसुली करणार ( लेबर फेडरेशनला आर्थिक शिस्त लावण्याचे काम बँकेचे अध्यक्ष बाबा करांडे यांनी सुरू ठेवले आहे?????)

मजूर संस्थांकडील 70 लाखांची वसुली करणार ( लेबर फेडरेशनला आर्थिक शिस्त लावण्याचे काम बँकेचे अध्यक्ष बाबा करांडे यांनी सुरू ठेवले आहे?????)

Next
बा करांडे; आर्थिक शिस्त लागल्याशिवाय संस्थेला भविष्य नाही
सोलापूर: मजूर संस्थांकडे असलेली थकबाकी वसुली सुरू असून अद्यापही 70 लाख रुपये थकीत आहेत. आर्थिक शिस्त लावल्याशिवाय संस्थेला भविष्य नाही, असे लेबर फेडरेशनचे अध्यक्ष बाबा करांडे यांनी सांगितले.
कर्मचार्‍यांचा पगार देण्यासाठीही पैसे नसलेल्या लेबर फेडरेशनला आर्थिक शिस्त लावण्याचे काम बँकेचे अध्यक्ष बाबा करांडे यांनी सुरू ठेवले आहे. मजूर संस्थांकडे लेबर फेडरेशनची कमिशनची 70 लाख इतकी रक्कम थकीत आहे. ही रक्कम वसूल करण्यासाठी सर्वप्रकारचे प्रयत्न केले जाणार असल्याचे करांडे यांनी सांगितले.
0 मजूर संस्थेच्या नावावर अनामत रक्कम देणे केले बंद
0 अध्यक्ष करांडे स्वत:ही अनामत रक्कम घेत नाहीत
0 फेडरेशनचे एक टक्का कमिशन वसूल केले जाते, कमिशनचे थकीत 7 लाख केले वसूल
0 कर्मचार्‍यांचा थकलेला पगार दिला, हक्काची वाढही दिली
0 पंढरपूर व सोलापूरमधील संस्थेच्या इमारती ठीकठाक करून संस्थांना भाड्याने देणार
चौकट
वसुलीसाठी कायदेशीर कारवाई
फेडरेशनचे माजी अध्यक्ष नितीन मोरे यांनी 11 लाख 80 हजार रुपये संस्थेचे वापरले होते. यापैकी 5 लाखांचा भरणा त्यांनी केला आहे. उर्वरित रक्कम वसुलीची प्रक्रिया सुरू आहे. बसवराज कुंटोजी यांनी 50 हजारांपैकी 20 हजार भरले आहेत. ब्र?ादेव भोसले यांच्याकडे एक लाख 10 हजार रुपये येणे आहे. वसुलीसाठी नोटिसानंतर पैसे नाही भरले तर कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
कोट
मजूर संस्थांना दिल्या जाणार्‍या कामाची र्मयादा वाढविण्यासाठी शासन पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. तो निर्णय होईलच. कामे करुन ज्यांनी बिले घेतली त्यांना नियमानुसार फेडरेशनचे कमिशन द्यावेच लागेल.
बाबा करांडे
अध्यक्ष, लेबर फेडरेशन


Web Title: To recover 70 lakhs from laborers (Bank President Baba Karande has continued the job of disciplining the Labor Federation financially)

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.