१२७ कोटींची वसुली एका दिवसात सहा कोटी वसुल : ९१ टक्के टार्गेट केले पूर्ण

By admin | Published: March 29, 2016 12:24 AM2016-03-29T00:24:24+5:302016-03-29T00:24:24+5:30

जळगाव : शासनातर्फे देण्यात आलेल्या महसूल वसुलीसाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जिल्हा प्रशासनाने तब्बल १२७ कोटी २६ लाखांची वसुली करीत ९१ टक्के टार्गेट पूर्ण केले आहे. येत्या तीन दिवसात १३ कोटी रुपयांची रक्कम वसूल करीत १०० टक्के टार्गेट पूर्ण करण्याबाबत प्रशासनाचा भर आहे.

Recovery of 127 crores is collected six crore in one day: 9 1 percent of the target is completed | १२७ कोटींची वसुली एका दिवसात सहा कोटी वसुल : ९१ टक्के टार्गेट केले पूर्ण

१२७ कोटींची वसुली एका दिवसात सहा कोटी वसुल : ९१ टक्के टार्गेट केले पूर्ण

Next
गाव : शासनातर्फे देण्यात आलेल्या महसूल वसुलीसाठी जिल्हा प्रशासनाने कंबर कसली आहे. मार्च महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत जिल्हा प्रशासनाने तब्बल १२७ कोटी २६ लाखांची वसुली करीत ९१ टक्के टार्गेट पूर्ण केले आहे. येत्या तीन दिवसात १३ कोटी रुपयांची रक्कम वसूल करीत १०० टक्के टार्गेट पूर्ण करण्याबाबत प्रशासनाचा भर आहे.
राज्य शासनाने जळगाव जिल्‘ासाठी जमीन महसूल, गौण खनिज, करमणूक तसेच अन्य महसुलाच्या वसुलीचे १४० कोटी रुपयांचे टार्गेट दिले आहे.
महसूल वसुलीसाठी बैठकांचा सपाटा
दुष्काळीस्थिती असल्याने यावर्षी वसुलीला काही प्रमाणात अडथळा येत आहे. मार्च ते डिसेंबर या ८ महिन्यात महसूल वसुलीच्या १४० कोटी रुपयांच्या टार्गेटपैकी जिल्हा प्रशासनाला केवळ ४१ कोटी ५१ लाख रुपयांची वसुली करता आली होती. जिल्हाधिकार्‍यांनी तालुकानिहाय बैठकांचा सपाटा सुरू करीत वसुली न करणार्‍या तलाठ्यांविरोधात कारवाईचे हत्यार उपसले होते. त्यानंतर जळगाव मनपासह अन्य नगरपालिकांकडील कराच्या स्वरुपात असलेल्या रकमेची कपात केली होती. मार्च महिन्याच्या सुरुवातीपासूनच जिल्हाधिकार्‍यांनी वसुलीला वेग दिला होता.
१२७ कोटींची वसुली
जिल्हा प्रशासनाने २८ मार्चपर्यंत वसुलीच्या उद्दिष्टापैकी तब्बल १२७ कोटी २६ लाख ८५ हजार रुपयांची वसुली केली आहे. त्यात जमिनी महसूलचे ६९ कोटी चार लाख १३ हजार रुपये वसूल केले आहे. तर करमणूक कराच्यापोटी सात कोटी ४० लाख ८३ हजार रुपयांची वसुली झाली आहे. गौण खनिज उत्खननाच्या माध्यमातून ५० कोटी ८१ लाख ८९ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

सोमवारी सहा कोटींची वसुली
गुरुवार ते रविवार या दरम्यान सु˜ी आल्याने काही प्रमाणात वसुलीला ब्रेक बसला. आठवड्याच्या पहिल्याच दिवशी म्हणजे सोमवारी जिल्हा प्रशासनाने तब्बल सहा कोटी १० लाख ९५ हजार रुपयांची वसुली केली आहे. यात जमीन महसूलच्या करापोटी चार कोटी ३९ लाख २७ हजार तर करमणूक करापोटील ५ लाख ९९ हजार व गौण खजिन उत्खननाच्या माध्यमातून १ कोटी ६५ लाख ६९ हजार रुपयांची वसुली करण्यात आली आहे.

Web Title: Recovery of 127 crores is collected six crore in one day: 9 1 percent of the target is completed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.