CRPF च्या 789 पदांसाठी भरती, विद्यार्थ्यांना नोकरीची मोठी संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 23, 2020 09:52 PM2020-07-23T21:52:10+5:302020-07-23T21:54:56+5:30
केंद्र सरकारच्या केंद्रीय राखीव पोलीस दलात तब्बल 789 पदांसाठी भरती निघाली असून निरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल, हवालदार या पदांवर ही भरती होत आहे.
मुंबई - केंद्रीय राखीव पोलीस दलात 789 जागांची भरती निघाली आहे. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या आणि एमपीएससी व युपीएससी परीक्षांमध्ये पीएसआय, तत्सम पोस्टसाठी मेहनत घेणाऱ्या तरुणांसाठी ही चांगलीच संधी आहे. देशात गेल्या 4 महिन्यांपासून लॉकडाऊन असल्याने भरतीप्रक्रिया पूर्णपणे बंद होती. मात्र, केंद्र सरकारने आता भरती प्रक्रियेला सुरुवात केली आहे.
केंद्र सरकारच्या केंद्रीय राखीव पोलीस दलात तब्बल 789 पदांसाठी भरती निघाली असून निरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल, हवालदार या पदांवर ही भरती होत आहे. त्यासाठी, उमेदवारांनी 31 ऑगस्टपर्यंत आपले अर्ज दाखल करायचे आहेत. उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने आपला अर्ज दाखल करता येणार आहे. या परीक्षेसाठी 20 जुलैपासून अर्ज भरण्यास सुरुवात झाली असून 31 ऑगस्टपर्यंत शेवटची मुदत देण्यात आली आहे.
केंद्रीय राखीव पोलीस दलासाठी निघालेल्या जाहिरातीनुसार या पदांसाठी 20 डिसेंबर रोजी परीक्षा होणार आहे.
CRPF भरती, 789 जागा
निरीक्षक, उपनिरीक्षक, सहायक उपनिरीक्षक, हेड कॉन्स्टेबल, हवालदार
Official Notification : https://bit.ly/2ZOtWVP
Official Website : https://crpf.gov.in/recruitment.htm
अर्ज करण्याची शेवटची तारीख – 31/08/2020