Government Jobs: कॅशिअर, इलेक्ट्रीशियन, क्लार्क, नर्ससाठी शेकडो पदांवर भरती; केंद्र सरकारी नोकरीची संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2020 17:15 IST2020-12-19T17:14:01+5:302020-12-19T17:15:35+5:30
Government Jobs: ही भरती वेगवेगळ्या पदांवर केली जाणार असून १० वी पास ते पदवीधारकांसाठी सरकारी नोकरीची (Sarkari Naukri) मोठी संधी उपलब्ध झाली आहे. या पदभरतीची नोटीस बेसिलने वेबसाईटवर जारी केली आहे.

Government Jobs: कॅशिअर, इलेक्ट्रीशियन, क्लार्क, नर्ससाठी शेकडो पदांवर भरती; केंद्र सरकारी नोकरीची संधी
Sarkari Job Vacancy 2020: ब्रॉडकास्ट इंजीनिअरिंग कंसल्टंट्स इंडिया लिमिटेड (BECIL) मध्ये नॉन फॅकल्टी ग्रुप बी व सीच्या शेकडो पदांवर भरती काढण्यात आली आहे. यामध्ये निवड होणाऱ्या उमेदवारांची भोपाळच्या एम्समध्ये (AIIMS Bhopal) नियुक्ती केली जाणार आहे. ही भरती वेगवेगळ्या पदांवर केली जाणार असून १० वी पास ते पदवीधारकांसाठी सरकारी नोकरीची (Sarkari Naukri) मोठी संधी उपलब्ध झाली आहे.
या पदभरतीची नोटीस बेसिलने वेबसाईटवर जारी केली आहे. ऑनलाईन अर्जाची प्रक्रिया ही १० डिसेंबरपासून सुरु झाली आहे. याच्या लिंक बातमीच्या खाली देण्यात येत आहेत.
पदांची एकूण संख्या - ७२७
पदे कोणती?
कॅशिअर, इलेक्ट्रीशियन, स्टेनोग्राफर, अपर व लोवर डिव्हिजन क्लार्क, स्टोअर कीपर, एडमिन ऑफिसर, असिस्टेंट इंजीनियर, पब्लिक हेल्थ नर्स, लायब्रेरियन, मॅनेजर, डाएटीशियनसह अनेक पदांवर जागा भरण्यात येणार आहेत.
कोणत्या पदासाठी शिक्षण, वयाची अट आदी माहिती नोटिफिकेशनमध्ये दिलेली आहे. याची लिंक खाली देण्यात आली आहे.
अर्ज कसा कराल?
या पदभरतीसाठी बेसिलच्या becil.com किंवा या becilaiimsbhopal.cbtexam.in वर जावे लागणार आहे. किंवा पुढे दिलेल्या डायरेक्ट लिंकवरही क्लिक करू शकता. अर्ज करण्याची अंतिम तारीख २६ डिसेंबर २०२० आहे. म्हणजेच अर्जासाठी आठवडाच शिल्लक राहिला आहे.
कुठे मिळेल मदत?
या भरतीसंबंधी माहिती हवी असल्यास तुम्ही खाली दिलेल्या ईमेल आयडींवर संपर्क करू शकणार आहात. तांत्रिक अडचणींसाठी khuswindersingh@becil.com, अन्य अडचणींसाठी maheshchand@becil.com हे ईमेल आयडी देण्यात आले आहेत.
उमेदवारांची निवड परिक्षा आणि मुलाखतीद्वारे करण्यात येणार आहे.
डायरेक्ट लिंक्स...
BECIL Job Notification साठी इथे क्लिक करा...
अर्ज करण्यासाठी इथे क्लिक करा...