पायलट व्हायचंय... एअर इंडियात हजाराहून जास्त वैमानिकांची भरती
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2023 10:27 AM2023-04-28T10:27:18+5:302023-04-28T10:27:33+5:30
सध्या कंपनीकडे १,८०० पायलट आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : टाटा समूहाच्या मालकीची हवाई वाहतूक कंपनी एअर इंडिया एक हजारपेक्षा अधिक वैमानिकांची नियुक्ती करणार आहे. यात वरिष्ठ वैमानिकांसह प्रशिक्षणार्थी वैमानिकांचाही समावेश असणार आहे. प्राप्त माहितीनुसार, एअर इंडियाने बोइंग आणि एअरबस या विमान निर्मिती कंपन्यांना ४७० विमानांच्या खरेदीसाठी ऑर्डर दिलेली आहे. यात मोठ्या आकारांच्या विमानांचाही समावेश आहे. सध्या कंपनीकडे १,८०० पायलट आहेत.
नव्या विमानांसाठी कंपनीला वैमानिकांची गरज लागणार आहे. एअर इंडियाच्या ताफ्यात ५०० पेक्षा अधिक विमाने सहभागी होत आहेत. त्यामुळे कंपनी एक हजारपेक्षा अधिक वैमानिकांची भरती करीत आहे. ए ३२०, बी ७७७, बी ७८७ व बी ७३७ या विमानांचा एअर इंडियाच्या ताफ्यात समावेश हाेणार आहे. कॅप्टन व प्रथम अधिकाऱ्यांसाेबतच प्रशिक्षकांचीही भरती करण्यात येईल.
ही कंपनी देणार ६ हजार जणांना नारळ
n खाणकाम क्षेत्रातील कंपनी ‘३ एम’ भारतासह अनेक देशांमधून सुमारे ६ हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढणार आहे.
n खर्च कमी करण्यासाठी कंपनीने हा निर्णय घेतला आहे. वर्षभरात कंपनीने ८,५०० कर्मचाऱ्यांना घरी बसविले आहे.