सुरक्षा आणि देखरेखीसाठी रेल्वे करणार दोन लाख कर्मचाऱ्यांची भरती, सातत्याने होत असलेल्या अपघातांमुळे निर्णय
By ऑनलाइन लोकमत | Published: August 23, 2017 11:20 AM2017-08-23T11:20:39+5:302017-08-23T11:27:11+5:30
गेल्या काही काळात एकापाठोपाठ एक झालेल्या रेल्वे अपघातांमुळे सुरक्षा आणि देखरेखीसाठी रेल्वेने मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे सुरक्षा तंत्र आणि मार्गावरील गस्त सुधारण्यासाठी पुढील काही वर्षांत सुमारे दोन लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे.
नवी दिल्ली, दि. 23 - गेल्या काही काळात एकापाठोपाठ एक झालेल्या रेल्वे अपघातांमुळे सुरक्षा आणि देखरेखीसाठी रेल्वेने मोठ्या प्रमाणावर कर्मचाऱ्यांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वे सुरक्षा तंत्र आणि मार्गावरील गस्त सुधारण्यासाठी पुढील काही वर्षांत सुमारे दोन लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याचा रेल्वे प्रशासनाचा मानस आहे. सध्या रेल्वेमध्ये सुरक्षा तंत्राशी संबंधित सुमारे 16 टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळे देशातील 64 हजार किमी लांबीच्या रेल्वे मार्गाची देखरेख आणि दुरुस्ती करण्यासाठी कर्मचाऱ्यांची कमतरता जाणवत आहे. भारतीय रेल्वे ही रोजगार देणाऱ्या देशातील सर्वात मोठ्या संस्थांमध्ये सामील असून, भारतीय रेल्वेकडे सद्यस्थितीत 13 लाख कर्मचारी आहेत.
नुकत्याच उत्तर प्रदेशमध्ये उत्कल एक्स्प्रेस रुळावरून घसरून झालेल्या अपघातानंतर रेल्वेच्या देखरेखीवर प्रश्न उपस्थित झाले होते. या अपघातात जवळपास 21 प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. तसेच गेल्या तीन वर्षांत झालेल्या रेल्वे अपघातांमध्ये सुमारे 650 हून अधिक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला होता. दरम्यान, आम्ही आपल्या नेटवर्कमधील बिघाड दुरुस्त करण्यासाठी 15 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करणार आहोत. ही रक्कम रेव्वेच्या आधुनिकीकरणावर खर्च करण्यात येणाऱ्या रक्कमेपेक्षा वेगळी असेल, असे रेल्वेच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले आहे. मॉडर्नाइजेशन पर खर्च की जाने वाली रकम से अलग होगी। यह पैसा ट्रैक के रिन्यूअल पर खर्च किया जाएगा।'
गेल्या तीन वर्षांमध्ये रेल्वेचे सरासरी 115 अपघात झाले आहेत. त्यामुळे पुढील काही काळात रेल्वेमध्ये होणाऱ्या कर्मचारी भरतीमध्ये सर्वाधिक कर्मचारी हे सुरक्षा आणि देखरेख विभागातील असतील. तसेच गँगमन, ट्रॅकमन यांना आंतरराष्ट्रीय दर्जाच्या मानकांनुसार प्रशिक्षित करण्यात येणार आहे. तसेच ट्रॅकवर नजर ठेवण्यासाठी 100 हून अधिक इंन्स्पेक्शन व्हेईकल्स खरेदी करण्याचाही रेव्वेचा विचार आहे. त्याबरोबरच रेल्वेच्या रुळांमधील तड्यांची संभाव्य माहिती देणाऱ्या सेंसर टेक्नॉलॉजीचे पायलट रनसुद्धा होईल.
अधिक वाचा
उन्माद करणाऱ्यांचे श्राद्ध घातल्याशिवाय राहणार नाही, उद्धव ठाकरेंचा भाजपाला अप्रत्यक्ष टोला
हातावरील टॅटूमुळे पकडले गेले चोर; सीसीटीव्ही फुटेजद्वारे पोलिसांनी लावला छडा
अलिबाबा डाटा चोर ! UC ब्राऊजर वापरत असाल तर सावधान, तुमचा डाटा थेट चीनच्या सर्व्हरमध्ये होतोय जमा
दरम्यान, आज पुन्हा एकदा रेल्वेला अपघात झाला असून, उत्तर प्रदेशमध्ये कैफियत एक्स्प्रेस रुळावरून घसरून झालेल्या अपघातात 74 प्रवासी जखमी झाले आहेत. उत्तर प्रदेशातील कानपूर आणि इटावा दरम्यान औरैया जिल्ह्यात 12225 (अप) कैफियत एक्स्प्रेसचा अपघात झाल्याचे सांगण्यात येत आहे. येथील अछल्दा आणि पाता रेल्वे स्टेशनच्या दरम्यान मानवरहीत क्रॉसिंगजवळ रेल्वे फाटक आहे. या ठिकाणी फाटक क्रॉस करणा-या डंपरला कैफियत एक्स्प्रेसने धडक दिली. यावेळी कैफियत एक्स्प्रेसचे इंजिनसह दहा डबे रुळावरुन खाली घसरले. ही घटना रात्री अडीच वाजताच्या सुमारास घडली. दरम्यान, या अपघातात त्यात ७४ प्रवासी जखमी झाले असून त्यापैकी चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. जखमींना औरैया येथील जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.